CIDCO : सिडकोकडून मोठा निर्णय ! आता एक नव्हे, दोन घरं खरेदी करण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CIDCO : जर तुम्ही सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नवी मुंबईत सिडकोच्या तब्बल 12,000 घरांची विक्री रखडली असून, ही घरं लिलाव प्रक्रियेतून विक्रीसाठी आणली जात आहेत. विशेष म्हणजे, याआधी असलेली “एक कुटुंब – एक घर” ही अट शिथिल करण्याची तयारी सुरू आहे, ज्यामुळे तुम्हाला सिडकोकडून दोन घरं खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

का पडली सिडकोची 12,000 घरं विक्रीविना? (CIDCO)

सिडको आणि म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांचा उत्साह कायम असतो. मात्र, यंदा सिडकोच्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याची मुख्य कारणं म्हणजे घरांचे वाढलेले दर, काही सुविधांचा अभाव नियमांमुळे अनेक इच्छुक वंचित यामुळेच (CIDCO) तब्बल 12,000 घरं अद्याप विक्रीविना पडून आहेत आणि त्यांची विक्रीसाठी सिडको नवीन धोरण आखत आहे.

नवीन नियमानुसार काय बदल होऊ शकतात?

सध्या, पती किंवा पत्नीच्या नावावर सिडकोचे घर (CIDCO) असल्यास दुसरे घर खरेदी करता येत नाही. मात्र, विक्रीत वाढ करण्यासाठी हा नियम शिथिल करण्याची तयारी सुरू आहे. जर हा निर्णय मंजूर झाला, तर एकाच कुटुंबाला दोन सिडको घरे घेण्याची संधी मिळेल.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी (CIDCO)

जर तुम्ही नवी मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी असू शकते. सिडकोच्या नवीन धोरणामुळे अधिकाधिक इच्छुकांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढेल आणि घर खरेदीसाठीच्या संधी अधिक खुल्या होतील. जर हा निर्णय अंतिम झाला, तर सिडकोच्या (CIDCO) सोडतीकडे पाठ फिरवणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली बातमी ठरू शकते. त्यामुळे सिडकोच्या अधिकृत घोषणेची वाट पाहा आणि तुमच्या गृहसप्नाची पूर्तता करा.