Cleaning Hacks : आता वारंवार टॉयलेट साफ करण्याची गरज नाही ; वापरून पहा ‘ही’ सोपी ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cleaning Hacks : अनेकदा टॉयलेट साफ करणे म्हणजे डोकेदुखी होऊन जाते. विशेषतः तुम्ही अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर वारंवार कमोड साफ करावे लागते. हल्ली एका टॉयलेट क्लीनर कंपनीने फ्लश टॅंक मध्ये टाकण्यासाठी विशेष गोळ्या तयार केल्या आहेत. ज्यामुळे वारंवार टॉयलेट साफ करण्याची गरज भासत नाही. जेव्हा टॉयलेट फ्लश केले जाते तेव्हाच ते त्या गोळी टाकलेल्या पाण्यामुळे स्वच्छ होते. पण तुम्हाला या फ्लश मॅटिक वर खर्च करायचा नसेल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक (Cleaning Hacks) सांगणार आहोत जेणेकरून घरच्याघरी हा फ्लश मॅटिक वापरू शकाल. तुम्हाला वारंवार टॉयलेट साफ करावे लागणार नाही चला तर मग जाणून घेऊया…

तुम्हाला घरच्या घरी अशा प्रकारचा फ्लश मॅटिक कसं (Cleaning Hacks) तयार करायचं ? हे आजच्या लेखात आम्ही सांगत आहोत तर या विषयाचा एक व्हिडिओ DIY 2 insta पेजवर शेअर करण्यात आला आहे. यासाठी आपल्याला खालील स्टेप्स फॉलो करावे लागतील.

  • हा उपाय करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता.
  • या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम एक टूथपेस्ट घेऊन टूथपेस्टच्या पाकिटावर (Cleaning Hacks) खालच्या बाजूने पिन वापरून काही छिद्र बनवून घ्या.
  • यानंतर टूथपेस्टचा जो सगळ्यात खालचा भाग असतो त्याच्या दोन्ही बाजूंनी तिरके छेद द्या.
  • आता हे टूथपेस्ट तुमच्या टॉयलेटच्या वॉटर स्टोरेज टॅंक मध्ये ठेवा आता यामुळे थोडी थोडी पेस्ट रिकामी होत जाईल आणि वॉटर टँक मधील पाण्यात मिक्स होत जाईल.
  • त्यामुळे जेव्हा जेव्हा टॉयलेट फ्लश केलं जाईल (Cleaning Hacks) तेव्हा तेव्हा ते पाणी टॉयलेट मध्ये आणि आपोआपच टॉयलेट स्वच्छ होईल.
  • कारण टूथपेस्ट मध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिफिक घटक असतात जे टॉयलेट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.