तुम्हाला माहिती आहे का ? की रोजच्या वापरातला धुण्याचा आणि अंगाला लावण्याचा साबण हा कशामुळे वितळतो बरं. तर साबण तयार करण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो आणि ह्या केमिकल्स जर ओलाव्याच्या संपर्कात आल्या तर साबण वितळायला लागतो. खर तर हे जे केमिकल्स आहेत ते कपड्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्वचेच्या स्वच्छता आणि संरक्षणासाठी साबणामध्ये वापरलेली असतात. आपण जर बघितलं तर पावसाच्या दिवसांमध्ये साबण झपाट्याने वितळू लागतो. कारण हवेमध्ये सुद्धा आर्द्रता असते त्यामुळे इतर ऋतूपेक्षा पावसाळ्यात साबण खूप जास्त प्रमाणात गळतो. मात्र काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आणि काही ट्रिक्स ट्राय केल्या तर तुमच्या बाथरूम मध्ये साबण वितळण्यापासून तुम्ही थांबू शकता आणि हाच साबण तुम्हाला जास्त काळ वापरता येऊ शकतो.
काय काळजी घ्याल?
- साबण अशा जागी ठेवा जिथं त्यावर पाणी पडणार नाही. कारण पाणी पडल्यामुळे साबण वेगाने वितळतो.
- जर बाथरूम मध्ये सतत ओलावा राहील अशा ठिकाणी तुम्ही साबण ठेवला तर साबण सुकत नाही आणि त्यामुळे तो ओला राहून गळत जातो.
- त्यामुळे साबण ठेवताना नेहमी हवेशीर आणि कोरड्या जागी ठेवा.
- शक्यतो साबण बाथरूम मधलया खिडकीजवळ ठेवा. म्हणजे हवेमुळे तो सुकेल आणि दीर्घकाळ टिकेल सुद्धा.
काय वापराल ट्रिक
जर तुम्हाला साबण वारंवार गळत असल्याची तक्रार असेल तर साबण जमिनीवर पसरण्यापासून रोखण्यासाठी साबण ठेवण्यासाठी एक बॉक्स घ्या या बॉक्सवर दोन रबर बँड लावा. आता जेव्हा जेव्हा तुम्ही साबण वापराल तेव्हा तो सांभाळता रबर बँड वर ठेवा म्हणजे त्याचा प्रत्यक्ष संपर्क हा त्या बॉक्सशी येणार नाही आणि पर्यायाने साबण कमी गळेल. शिवाय साबण गळणार आहे तो बॉक्सच्या खालच्या बाजूला पडेल त्यामुळे नंतर हा जो गळालेला साबण आहे तुम्ही कपडे धुण्यासाठी वापरू शकता.
साबण न चुकता बॉक्स मध्ये ठेवा. कारण हेच तुमच्या फायद्याचे आहे. साबणाचा वापर करून झाल्यानंतर तो व्यवस्थित कोरड्या असणाऱ्या बॉक्समध्ये ठेवा बॉक्स जर ओला असेल तर पुन्हा साबण ओला होईल आणि गळत राहिल.