CMF Phone 2 Pro: CMF Phone 2 Pro भारतात लाँच; बजेटमध्ये मिळणार दमदार स्मार्टफोन

CMF Phone 2 Pro (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CMF Phone 2 Pro – नथिंग कंपनीने आपला बजेट स्मार्टफोन CMF Phone 2 Pro भारतात आज (28 एप्रिल 2025) अधिकृतपणे लाँच केला आहे. यापूर्वी 2024 मध्ये कंपनीने आपला पहिला बजेट फोन CMF Phone (1) सादर केला होता, ज्याला युनिक डिझाईन अन कलर ऑप्शन्समुळे चांगला प्रतिसाद मिळाला होता. नव्या फोनमध्येही याच स्टाईलचा वारसा चालवण्यात आला असून, यावेळी डिव्हाइस आकर्षक ऑरेंज कलर व्हेरियंट अन ड्युअल-टोन फिनिशसह सादर झाला आहे. फोनचा लूक अधिक पॉलिश्ड असून त्यात मॉड्युलर डिझाइन दिले गेले आहे.

CMF Phone 2 Pro फीचर्स –

डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED पॅनल असून, त्याला 120Hz रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, आणि टेम्पर्ड ग्लास प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये एक विशेष फिजिकल बटण देखील आहे, ज्याद्वारे कस्टम ऍक्शन जसे की फोटो काढणे, स्क्रीन रेकॉर्डिंग, किंवा ऑडिओ कंट्रोल करता येते. प्रोसेसरबाबत बोलायचं झाल्यास, यामध्ये MediaTek Dimensity 7300 Pro चिपसेट दिला असून, हा प्रोसेसर गेमिंगसाठी जबरदस्त परफॉर्मन्स देतो. कंपनीचा दावा आहे की या फोनवर BGMI सारखा गेम 120fps वर सहज चालतो. यामध्ये 1000Hz टच सॅम्पलिंग रेट, 8GB रॅम अन 128GB स्टोरेज मिळेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी अन 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

कॅमेरा सेटअप –

CMF Phone (2) Pro मध्ये दिलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप हा बजेट सेगमेंटसाठी खूपच प्रभावी आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 2x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो लेन्स, आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स समाविष्ट आहे. या कॅमेरा सेटअपमुळे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सहज शक्य आहे. तसेच, चांगल्या दर्जाचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात येणार आहे.

AI-आधारित फीचर्स –

हा फोन Android 15 वर आधारित Nothing OS 3 दिलं गेलं आहे, ज्यामध्ये AI-आधारित फीचर्स आणि एक खास Nothing Space इंटरफेस असेल. विशेष म्हणजे, यावेळी कंपनीने फोनसोबत चार्जर आणि कवर बॉक्समध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत टाइप-C केबल आणि सिम इजेक्टर पिनही मिळेल.

किंमत (CMF Phone 2 Pro) –

या CMF Phone (2) Pro ची किंमत 20,000 रुच्या आत ठेवण्यात येईल अशी शक्यता आहे, त्यामुळे हा फोन बजेट सेगमेंटमधील सर्वात आकर्षक पर्याय ठरू शकतो. फोन फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्हली उपलब्ध असेल.