Colors Marathi : ‘सुख कळले’ मालिकेत झळकणार स्पृहा जोशी आणि सागर देशमुख; पहिल्याचं प्रोमोने जिंकलं प्रेक्षकांचं मन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम विविध ढंगाच्या आणि अनोख्या कथानकाच्या कमाल मालिका घेऊन येत असते. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी एका प्रकारे मनोरंजनाचा खजिना आहेत. कायम काहीतरी वेगळं आणि हटके देण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत या वाहिनीने एकापेक्षा एक सरस मालिका दिल्या आहेत. आताही एक अशीच वेगळी आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी नवी मालिका येऊ घातली आहे.

नवी मालिका

अलीकडेच कलर्स मराठी सुरु होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेची घोषणा झाली. या मालिकेचे शीर्षक गीत प्रेक्षकांचा प्रचंड आवडले. यानंतर आता लवकरच ‘सुख कळले’ ही आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठी (Colors Marathi) घेऊन येत असल्याचे समोर आले आहे. नुकताच या मालिकेचा पहिला वहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. मालिकेचे नाव ‘सुख कळले’ असून यातून एक गोड कथानक आपल्या भेटीसाठी सज्ज असल्याचे समजत आहे. मालिकेच्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत.

मालिकेचा टिझर पाहून आनंद होण्याचे कारण म्हणजे रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरली आहे. कलर्स मराठीच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. (Colors Marathi) मुख्य म्हणजे केवळ स्पृहा जोशी नव्हे तर तिच्याबरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुखदेखील या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या तरी ही मालिका कधी सुरु होणार? या बाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. असे असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

पहिल्याचं प्रोमोने जिंकलं प्रेक्षकांचं मन (Colors Marathi)

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. ‘सुख कळले’ ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा आणि सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असल्याचे समजते. जी प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी आशा आहे. (Colors Marathi)