हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनचा वापर करणाऱ्याची संख्या वाढत असून , अलीकडे फोनमधील वेगवेगळ्या फीचर्सने लोकांना भारावून टाकले आहे. त्यातच 2024 मध्ये AI फीचर्सने सज्ज स्मार्टफोन बाजारात धडाक्यात आले आहे. पण हे तंत्रज्ञान सध्या काही मर्यादित डिव्हाईसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये हे तंत्रज्ञान अनेक स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बाजारातील स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ दिसून येणार आहे. AI ची वाढती मागणी , हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील गुंतवणूक तसेच 5G तंत्रज्ञानातील बदल यामुळे स्मार्टफोन उत्पादकांना मोठा खर्च करावा लागत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिमाण होणार आहे.
किंमतीत 5% वाढ होण्याची शक्यता –
एका अहवालानुसार 2025 पर्यंत स्मार्टफोनच्या जागतिक सरासरी विक्री किंमतीत 5% वाढ होण्याची शक्यता आहे. पॉवरफुल प्रोसेसर, कॅमेरा आणि AI सारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रीमियम स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. जनरेटिव्ह AI सारख्या तंत्रज्ञानाची क्रेझ वाढल्याने उत्पादकांना अधिक कार्यक्षम CPU, GPU, आणि NPU तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
स्मार्टफोन खरेदीसाठी अधिक खर्च –
स्मार्टफोनची किमत वाढत असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना काळजीपूर्वक विचार करावा लागेल. AI फीचर्स आणि प्रीमियम हार्डवेअरचे फायदे जाणून घेत, स्मार्टफोनची निवड करणे गरजेचे आहे. 2025 मध्ये AI आधारित स्मार्टफोनमुळे डिजिटल अनुभव नक्कीच वेगळ्या उंचीवर जाईल, पण यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.