Cool Places To Visit In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘ही’ थंड ठिकाणे देतील उन्हाळ्यात गारवा; चिल करायला जरूर जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cool Places To Visit In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे. पण उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर मस्त थंड ठिकाणी जाणं पसंत केलं जात. एकीकडे राज्यभरात उष्ण वाऱ्यांनी थैमान घातलं असताना मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून एकतरी पिकनिक प्लॅन करायला हवाच. मग अशावेळी कुठे जायचं? असा प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. उन्हाळ्यात थंडावा देतील अशी महाराष्ट्रात अनेक ठिकाण आहेत. त्यापैकी ५ थंड पर्यटन स्थळांविषयी आपण जाणून घेऊ.

पाचगणी

पाचगणी हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असे थंड हवेचे ठिकाण आहे. जे टेबल लँडसाठी ओळखले जाते. येथे सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट, धोम धरण, तलाव, कमलगड, राजपुरी लेणी पाहण्यासारखी ठिकाण आहेत.

माथेरान (Cool Places To Visit In Maharashtra)

महाराष्ट्रातील माथेरान हे अत्यंत सुंदर आणि थंड हवेचे प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे. मुंबई शहरापासून अत्यंत जवळ असलेले हे पर्यटन स्थळ जगभरात प्रसिद्ध आहे. लहान असले तरीही निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेले हे ठिकाण थंड हवेमूळे मनाला गारवा देते. त्यामुळे उन्हाळ्यात माथेरान फिरणे फारच आल्हाददायी वाटते.

लोणावळा

मुंबईपासून अगदी जवळ असलेले लोणावळा हे देखील अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. लोणावळ्याची चिक्की जगप्रसिद्ध आहेच. पण उन्हाळ्यात लोणावळा फिरण्याची मजाच वेगळी आहे. (Cool Places To Visit In Maharashtra) इथले नैसर्गिक सौंदर्य आणि थंडगार वारे अनुभवायला अनेक पर्यटक खास करून उन्हाळ्यात येत असतात. शहरापासून जवळ असल्यामुळे शनिवार आणि रविवार लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.

खंडाळा

लोणावळ्यानंतर मुंबईकरांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून खंडाळा देखील तितकेच प्रसिद्ध आहे. खंडाळा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायला एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणाला भेट दिल्यावर आपला मूड एकदा रिफ्रेश होतो.

लवासा

लवासा एक सुनियोजित खाजगी शहर आहे. जे पुण्यापासून अगदी जवळ आहे. इथे धरणे, बोगदे, तलाव आणि पूल पाहण्यासारखे आहेत. तसेच येथील इमारतींचे बांधकाम देखील अत्यंत वेगळे आणि आकर्षक आहे. (Cool Places To Visit In Maharashtra)