Covid 19 Symptoms : काळजी घ्या ! JN.1 कोविडचा धोका वाढतोय! भारतात ‘ही’ दोन नवीन लक्षणं समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Covid 19 Symptoms : कोरोनाने मागील काही वर्षांत जगभरात थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हा विषाणू नव्या रूपात भारतात डोके वर काढतोय. विशेषतः JN.1 नावाच्या ओमिक्रॉनच्या उप-प्रकारामुळे चिंता वाढली आहे. सिंगापूर, हाँगकाँगसारख्या देशांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसतेय आणि भारतातीलही अनेक भागांत याचे संक्रमण वाढू लागले आहे.

नवीन वेरिएंट, जुने लक्षणे, पण नवी चिंता

JN.1 हा ओमिक्रॉनचा एक उप-प्रकार असून तो BA.2.86 म्हणजेच ‘पायरोला’ वेरिएंटमधून विकसित झालेला आहे. हा विषाणू 2023 मध्ये प्रथम लक्झमबर्गमध्ये आढळला आणि आता तो भारतातही सक्रिय झाला आहे.

विशेष म्हणजे, या वेरिएंटमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये झालेले म्युटेशन्स याला अधिक वेगाने मानवांमध्ये पसरण्यास सक्षम करतात.

JN.1 ची प्रमुख लक्षणं

  • सौम्य ताप किंवा थंडी वाजणे
  • कोरडी खोकला
  • घशात खवखव
  • थकवा
  • डोकेदुखी
  • सर्दी/नाक बंद होणे
  • अंगदुखी
  • गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास पण दोन लक्षणं विशेष आहेत –

सतत सौम्य ताप (Persistent Low-Grade Fever)

पुर्वीच्या कोविड प्रकारांमध्ये ताप अचानक वाढत असे, पण JN.1 मध्ये 99.6°F ते 100.5°F दरम्यान सौम्य ताप दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे अनेकदा हा लक्षण लक्षात न घेता थकवा किंवा इतर सामान्य आजार समजला जातो.

कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; कोणत्या जिल्ह्यांत किती संख्या?

पचनतंत्राशी संबंधित त्रास (Gastrointestinal Issues)

या प्रकारात अनेक रुग्णांना अपचन, मळमळ, भूक न लागणे, पोटात गडबड किंवा जुलाब यांसारखे लक्षणं अधिक प्रमाणात जाणवत आहेत. ही लक्षणं श्वसन तक्रारींपूर्वीही दिसून येतात.

काय म्हणतात तज्ज्ञ?

डॉ. अनिल शर्मा (जयपूर) यांच्या मते, हा वेरिएंट शरीरात आतून वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. त्यामुळे पचन तंत्रावर परिणाम होणं नवीन बाब असली, तरी श्वसन तक्रारी तुलनेने कमी गंभीर आहेत – ही दिलासादायक गोष्ट आहे.

काळजी घ्या, घाबरू नका

मास्क वापरा – बंद जागा, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं अजूनही आवश्यक
हात धुवा – स्वच्छता ही सर्वोत्तम सुरक्षा
लक्षणं दिसल्यास टेस्ट करा – उशीर न करता तपासणी करून इतरांना संक्रमणापासून वाचवा
टिकवून ठेवा सुरक्षित अंतर – आजारी व्यक्तींपासून लांब राहा
टीकाकरण पूर्ण करा – बूस्टर डोस घेणं फायदेशीर ठरू शकतं
हवा खेळती ठेवा – ऑफिस, घरे व सार्वजनिक जागी वायुवीजन महत्वाचं

कोविड आता एक स्थानिक (Endemic) आजार म्हणून ओळखला जातो, पण त्याचे नवीन रूप अजूनही धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे खबरदारी घ्या, स्वतः आणि इतरांचं आरोग्य सुरक्षित ठेवा.