Credit Card Use : सावधान!! क्रेडिट कार्ड वापरताना ‘या’ चुका केल्यास CIBIL स्कोअर होईल खराब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card Use) गेल्या काही काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण क्रेडिट कार्डच्या वापर करून जितके जास्त व्यवहार केले जातात तितके जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या रिवॉर्ड पॉइंट्सच्या माध्यमातून तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो. शिवाय काही वस्तू, गिफ्ट्स किंवा शॉपिंगसुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण क्रेडिट कार्ड ही एक प्रकारे जबाबदारी आहे. याबाबत लोकांना विसर पडतो.

क्रेडिट कार्डचा वापर फायदेशीर आहे यात काहीच वाद नाही. मात्र क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि कर्ज म्हणजे जबाबदारी. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण एकप्रकारे कर्ज घेऊन खरेदी करत असतो. (Credit Card Use) ज्याची प्रत्येकाला परतफेड करावी लागते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना एक चूकसुद्धा भारी महागात पडू शकते. तुमच्याकडून अशा चुका होऊ नये म्हणून आज आपण क्रेडिट कार्डचा वापर करताना कोणत्या चुका त्रासदायी ठरू शकतात ते जाणून घेणार आहोत. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कोणते ३ व्यवहार केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

पैसे काढण्यासाठी ATM चा वापर (Credit Card Use)

क्रेडिट कार्डमधून पहिल्या दिवसापासून तुम्ही ATM चा वापर करून जेव्हढी रोख रक्कम काढता त्यावर भारी व्याज आकारले जाते. हे व्याज प्रत्येक महिन्याला २.५ ते ३.५ टक्के दराने आकारले जाण्याची शक्यता असते. यासोबत फ्लॅट ट्रान्झॅक्शन टॅक्ससुद्धा भरावा लागतो.

दरम्यान क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीचे बिल भरायला तुम्हाला १ महिन्याचा कालावधी मिळतो. (Credit Card Use) या कालावधीपर्यंत तुम्ही बिल भरू शकला नाहीत तर याचेही व्याज आकारले जाते. त्यामुळे ATM मधून काढलेली रोख परतफेड करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यावर व्याज चढत जाते.

महागडे आंतरराष्ट्रीय व्यवहार

क्रेडिट कार्डचा वापर हा मूळ देश ते विदेशातसुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. अनेक युजर्सला याबाबत संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे जेव्हा परदेशात क्रेडिट कार्डचा वापर केला जातो तेव्हा व्यवहार शुल्क भरावे लागते. जे कमी जास्त असू शकते. (Credit Card Use) त्यामुळे जर तुम्हाला परदेशात रोख रकमेऐवजी कार्ड वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर टाळून प्रीपेड कार्डचा वापर करू शकता.

एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरणे

क्रेडिट कार्डवर बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय असतो. ज्याच्या वापराने एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरता येतं. यासाठी एका क्रेडिट कार्डवरील बिल भरण्यासाठी ३०- ४५ दिवस मिळतात. त्यामुळे दुसऱ्या क्रेडिट कार्डवर पहिले पेमेंट करता येते. अशा प्रकारे बिल भरण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी मिळतो. मात्र शिल्लक हस्तांतरण विनामूल्य नसते. त्यामुळे क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेला याचे शुल्क भरावे लागते.

(Credit Card Use) अर्थात जर तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी दुसऱ्या क्रेडिट कार्डचा वापर केलात तर तुम्ही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेत आहात असा याचा अर्थ होतो. एखाद्या अड्चणीवेळी असे केल्यास ठीक आहे. पण याची सवय पडल्यास तुमचा CIBIL स्कोअर खराब होऊ शकतो.