हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिझक (Crizac), एक स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन प्रदाता कंपनी असून, ते लवकरच आपला आयपीओ लाँच करणार आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे आपला सुधारित ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) पुन्हा सादर केला. या आयपीओद्वारे 1000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा हेतू आहे.
ऑफर फॉर सेल द्वारे शेअर्स –
आयपीओमध्ये फ्रेश शेअर्स जारी केले जाणार नाहीत. फक्त प्रमोटर्सकडून ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर्स विकले जातील. याचा अर्थ आयपीओमधून मिळालेली संपूर्ण रक्कम विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडे जाईल. ओएफएसमध्ये पिंकी अग्रवाल 841 कोटी रुपयांचे शेअर्स आणि मनीष अग्रवाल 159 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. याआधी कंपनीने मार्च 2024 मध्ये मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. पण सेबीने जुलै महिन्यात कंपनीला आयपीओची कागदपत्रे परत केली होती.
ग्लोबल स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन्स पुरवते –
क्रिझक ही कंपनी युनायटेड किंगडम, कॅनडा, रिपब्लिक ऑफ आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील उच्च शिक्षण संस्थांना ग्लोबल स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन्स पुरवते. आर्थिक वर्ष 2022 ते सप्टेंबर 2024 दरम्यान कंपनीने 135 पेक्षा जास्त जागतिक उच्च शिक्षण संस्थांसोबत काम करत 5.95 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ऍप्लिकेशन्स प्रोसेस केली. कंपनीच्या जागतिक स्तरावर सुमारे 7900 एजंट्स आहेत जे त्यांच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर नोंदवलेले आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 274 कोटींपासून 93.4 टक्क्यांनी वाढून 530 कोटी झाला. तसेच एबिटडा 37.2 टक्क्यांनी वाढून 143.8 कोटी झाला, पण मार्जिन मागील वर्षाच्या तुलनेत 1110 बीपीएसने घसरून 27.1 % वर आलेला आहे .