Kas Pathar : कास पठार बहरलं ! पर्यटकांची गर्दी , प्रशासनाचीही दमछाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kas Pathar : सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होते आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठार आता फुलांनी बहरून गेले आहे. त्यामुळे विकेंडला कास पठार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे पाहायाला मिळाले. २१ आणि २२ तारखेला कसा पठार पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी (Kas Pathar) केली होती.

बघ्यांची गर्दी अन प्रशासनाची दमछाक (Kas Pathar)

जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेलं कास पठार आता सध्या फुलांनी भरून गेल्यामुळे पर्यटकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. मात्र कास पठाराला जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी येथे झाली होती. या गर्दीला आवरताना मात्र प्रशासनाची मोठी दमछाक होताना पाहायला मिळाली. दुसरीकडे पर्यटकांना बुकिंग मशीन बंद करून ठेवून तुम्ही कुठेही जा पण पठारावर प्रवेश मिळणार नाही अशी भूमिका घ्यावी लागल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाइन बुकिंग करून साधारणपणे तीन हजार लोक इथे येतात. तर थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या 5000 च्या वरती होती. एकूण 10 हजारांपेक्षा अधिक पर्यटक एकाच दिवशी कास पठारावर आल्यानं नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि व्यवस्थापन समितीने ऑफलाईन आलेल्या पर्यटकांचे बुकिंग दुपारनंतर बंद केल्यामुळे आणि पार्किंगची जागा फुल्ल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाड्या लावत पठारावर चालत जाणं अनेकांनी पसंत केलं. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीच्या (Kas Pathar) समस्येला सामोरे जावं लागलं.

अजूनही फुले पाहण्याची संधी

सध्याची परिस्थिती पाहता कास पठारावर जिथे तिथे फुलांचे गालीचे तुम्हाला पाहायला मिळतील अजूनही ही फुलं तुम्हाला पाहण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस पाहून अनेक (Kas Pathar) पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. कास पठारावर एका व्यक्तीसाठी 150 रुपये इतका प्रवेश शुल्क आकारला जातो.

कसे कराल बुकिंग? (Kas Pathar)

कास पठाराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर http://www.Kas.ind.in या वेबसाईटवर बुकिंग करणं गरजेचं आहे. तसंच जास्तीत जास्त ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करून जावे.

कास पठार साताऱ्यापासून 25 किलोमीटर, महाबळेश्वर पासून 37 किलोमीटर आणि पाचगणी पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. इथं फुलांच्या 800 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. तर हे पठार तब्बल 1000 हेक्टर क्षेत्रामध्ये (Kas Pathar) पसरलेले आहे.

फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ (Kas Pathar)

कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदांसमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले. त्यातलं कास हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक (Kas Pathar) वारसा स्थळ आहे.