Cuddling Benefits : एक मिठी वाढवते आयुष्य!! हृदय विकार ते अनिद्रेचा त्रासांवर ठरते परिणामकारक; जाणून घ्या फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cuddling Benefits) कामाचा ताण, घरगुती कलह, एकटेपणा यामुळे अनेकदा आपल्याला ताणतणावाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे आपण चिडचिडे होतो. तसेच कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. शारीरिक आणि मानसिकरित्या आपण कमकुवत होऊ लागतो. अशावेळी कोणीतरी जवळ घ्यावे, मिठी मारून डोक्यावर हात फिरवावा असे वाटते. याला कडलिंग असे म्हणतात. ही क्रिया शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानली जाते. कडलिंग हे पालक- मुले, मित्र – मैत्रिणी किंवा जोडीदार कोणीही करू शकतो. एक मिठी मोठ- मोठ्या आजारांवर मात करण्याचे बळ देऊ शकते, असे तज्ञ सांगतात. चला तर जाणून घेऊया मिठी मारण्याचे आपल्या आरोग्यावर नेमके कोणते आणि कसे परिणाम होतात?

(Cuddling Benefits) मिठी मारल्यामुळे आपल्या शरीरातील ‘बॉण्डिंग हार्मोन’ म्हणजेच ऑक्सिडोसीन सक्रिय होते. त्याची कार्यक्षमता वाढते. ज्यामुळे आपल्या मनातील विश्वास, आत्मियता, जिद्द आणि सलगीच्या भावना जागृत होतात. यामुळे मानसिकदृष्ट्या आपल्याला स्थिर होण्यासाठी फायदा होतो. केवळ मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर इतर अनेक असे फायदे आहेत ज्याविषयी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मिठी मारल्यामुळे होणारे फायदे (Cuddling Benefits)

1. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

मिठी मारल्यामुळे किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या शारीरिक स्पर्शामुळे आपल्या शरीरातील ‘कॉर्टिसोल’ सारख्या तणाव हार्मोन्सची पातळी काही प्रमाणात कमी होते. यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती आणि रक्तदाब संतुलित होते. परिणामी चिंता आणि एन्गझायटी कमी होते. यामुळे आपल्याला आराम मिळतो.

2. मानसिक ताण कमी होतो

अनेकदा कामाचा व्याप आणि घरातील विविध समस्या मानसिक ताणतणावाचे कारण ठरतात. (Cuddling Benefits) कधी कधी हा ताण इतका जास्त असतो की यातून निर्माण होणाऱ्या वेदनांमुळे मेंदूला इजा होऊ शकते. इतकेच नव्हे तर मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या नसांचे देखील नुकसान होते. मात्र आपल्या माणसाची एक मिठी हा ताण कमी करतो आणि आपल्याला आराम देतो.

3. शारीरिक आणि भावनिक वेदनांची तीव्रता कमी होते

अनेकदा शारीरिक आणि भावनिक वेदनांनी माणूस कमकुवत होतो. एखादी घटना, आजार किंवा हार्मोन्सचे असंतुलन शारीरिक आणि भावनिक वेदनांचे कारण असू शकते. (Cuddling Benefits) मात्र मिठी मारल्याने आपल्या शरीरातील ‘एंडोर्फिन’ घटक उत्तेजित होतो आणि यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. परिणामी आनंद आणि समाधान मिळते. ज्यामुळे ताण- तणाव कमी होऊन शारीरिक आणि भावनिक वेदना कमी होतात.

4. शांत झोप लागते

आपल्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारून झोपल्यामुळे शरीराला आराम मिळतो. मनातील असुरक्षिततेची भावना कमी होते. ज्यामुळे अनिद्रा, झोप मोड अशा समस्या दूर होतात. (Cuddling Benefits)