Danger Video Clip : रीलसाठी कायपण!! झाडाच्या शेंड्यावर चढून तरुणीचा डान्स; Video पाहून धडकीच भरेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Danger Video Clip) आजकाल फेमस होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. त्यातल्या त्यात आजच्या डिजिटल युगात प्रसिद्धीसाठी नुसता एक रील व्हिडिओदेखील पुरेसा आहे. जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधण्यात मग्न असतो. यामध्ये अनेक कन्टेन्ट क्रिएटर्सचा समावेश आहे. यांपैकी एका युवतीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून काळजाचा ठोका चुकू शकतो.

सोशल मीडियावर एका तरुणीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ही तरुणी चक्क झाडावर चढून नव्हे तर झाडाच्या निमुळत्या शेंड्यावर चढून डान्स करताना दिसते आहे. (Danger Video Clip) केवळ प्रसिद्धी साठी आणि लाईक्स मिळवून फॉलोवर्स वाढवण्यासाठी ती आपल्या जीवासोबत खेळतेय. तिचं हे धाडस भारी अंगलट येऊ शकतं याचा तिलाही अंदाज आहे. पण तरीसुद्धा ती बिंधास्त डान्स करत आहे. ती झाडाच्या सगळ्यात उंच टोकावर चढून क्लासिकल डान्स करताना दिसतेय. या व्हिडिओंमध्ये ती बॉलिवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसतेय.

पहा व्हायरल व्हिडिओ (Danger Video Clip)

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडिओ miss_pooja_official_887 नावाच्या हॅण्डलवरून शेअर करण्यात आले आहेत. झाडाच्या अत्यंत बारीक फांदीवर चढून ही तरुणी अगदी बिनधास्त डान्स करते आहे.

तिचा डान्स बरा असला तरीही तिने केलेलं धाडस धडकी भरवणारं आहे. हे व्हिडीओ पाहताना सगळ्यात आधी विचार येतो की, फांदी तुटली आणि ही तरुणी पडली तर?? केवळ प्रसिद्धीसाठी युवतीने केलेले हे धाडस पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेटकरी म्हणाले..

सोशल मीडियावर हे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. यावर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘झाडावर चढण्याआधी जीवन बिमा काढलाय का?’

तर आणखी एकाने म्हटले, ‘भारतीय नृत्य एवढ्या उंचीवर पोहोचले आणि मला कळलेच नाही’. तर अन्य एका युजरने लिहिलंय, ‘मी हे झाड खाली पडण्याची वाट पाहतोय’. (Danger Video Clip)