अडीच तासांचा प्रवास 25 मिनिटांत, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील महत्वाचा भाग ‘या’ दिवशी होणार खुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा दिल्ली भाग १२ नोव्हेंबरला सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो. त्यामुळे मथुरा रोडवरील ट्रॅफिक जामपासून दिलासा मिळणार आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, एक्सप्रेसवेवर सहा लेन आहेत आणि आग्रा कालवा आणि गुडगाव कालव्यावर दोन नवीन पूलही बांधले गेले आहेत.

वाहतूक कोंडीपासून सुटका

एक्स्प्रेस वे आणि पूल सुरू झाल्याने मथुरा रोडवरील जाम पूर्णपणे सुटणार असल्याचे बिधुरी यांनी सांगितले. हा केवळ पर्यायी मार्ग नसून मथुरा रोडवरील अवजड वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय असल्याचे ते म्हणाले. हा नवीन द्रुतगती मार्ग यमुना नदीच्या काठावरील यमुना खादर, ओखला विहार आणि बाटला हाऊस सारख्या गजबजलेल्या भागातून जातो. त्याचा खालचा भाग महाराणी बागेजवळ बांधण्यात आला असून तो DND उड्डाणपुलाच्या आश्रम प्रवेशद्वाराजवळील रस्ता ओलांडून जाईल.

अडीच तासांचा प्रवास 25 मिनिटांत

खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर 5500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्याचा उपयोग फरीदाबाद, पलवल आणि सोहना येथे जाण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे लोकांचा वेळही वाचणार आहे. सध्या महाराणी बागेतून सोहना येथे पोहोचण्यासाठी अडीच तासांचा अवधी लागतो, मात्र एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर हा वेळ केवळ २५ मिनिटांवर येणार आहे.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा भारतातील एक आधुनिक रस्ता मार्ग आहे. या द्रुतगती मार्गावरील वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास आहे, ज्यामुळे हा देशातील सर्वात वेगवान रस्त्यांपैकी एक आहे. या एक्स्प्रेस वेवर प्राणी आणि पादचाऱ्यांना प्रवेश पूर्णपणे बंदी आहे. या एक्स्प्रेस वेवर दुचाकी आणि स्लो वाहनांना प्रवेश बंदी आहे. 12 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या सोहना-दौसा सेक्शनचे उद्घाटन केले होते.