Delhi To Srinagar Indigo Flight : निसर्गापुढे सगळंच फेल ! गारपिटीमुळे विमानाचे फुटले तोंड, प्रवाशांनी अनुभवला मृत्यूचा थरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Delhi To Srinagar Indigo Flight : दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-2142 फ्लाइटमध्ये मोठा अनर्थ टळला. या विमानात 227 प्रवासी सवार होते. अचानक खराब हवामानामुळे विमानाला जोरदार झटके बसायला लागले आणि वातावरणात घबराट निर्माण झाली. संध्याकाळच्या सुमारास दिल्लीमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला. याच वेळी विमान आकाशात विजांच्या झंझावातात (Delhi To Srinagar Indigo Flight ) सापडले.

हवेतच विमानाला विजेचा धक्का बसल्याने समोरचा ‘नोज पॉइंट’ (नाकाचा भाग) खराब झाला. ही स्थिती लक्षात घेऊन पायलटने तातडीने निर्णय घेत श्रीनगर एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधला आणि विमानाची आपत्कालीन लँडिंग केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर सोशल मीडियावर विमानाच्या आतले व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्रवाशांनी या थरारक अनुभवाचे क्षण व्हिडिओमध्ये टिपले असून, त्यात काही जण प्रार्थना करताना, तर काही जण अतिशय भीतीने थरथरताना दिसत आहेत. एका प्रवाशाने (Delhi To Srinagar Indigo Flight ) विमानाचा समोरचा भाग खराब झाल्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.


AOG घोषित,विमान तात्पुरते जमिनीवर

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व 227 प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप आहेत. मात्र विमानाचे पुढील तांत्रिक तपासणीसाठी एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड (AOG) घोषित करण्यात आले आहे. याचा अर्थ हे विमान सध्या तांत्रिक कारणामुळे उड्डाणासाठी पात्र नाही आणि जमिनीवरच थांबवण्यात आले आहे.

प्रवाशांनी व्यक्त केला अनुभव

विमानात असलेल्या ओवैस मकबूल हकीम या प्रवाशाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले “मी विमानात होतो… हा मृत्यूसारखा अनुभव होता. विमानाचा समोरील भाग पूर्णपणे खराब झाला होता.” आणखी एका पोस्टमध्ये त्याने सांगितले की, विमानाच्या उजव्या बाजूलाही नुकसान झाले होते आणि त्याठिकाणी हवाई दलाचे पोलिस असल्यामुळे प्रवाशांना त्या भागाजवळ जाण्याची परवानगी नव्हती.

एअरलाईनकडून अधिकृत प्रतिक्रिया

इंडिगोने एका निवेदनात सांगितले की, “दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या 6E-2142 फ्लाइटला मार्गात अचानक ओलावृष्टीचा सामना करावा लागला. विमान आणि क्रूने सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत श्रीनगरमध्ये सुरक्षित लँडिंग केली.” त्यानंतर एअरपोर्टवर टीमने प्रवाशांची काळजी घेतली आणि विमानाची तपासणी केली जात आहे.

एकूणच काय?

या घटनेमुळे विमानप्रवासातील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रसंगी पायलटची प्रसंगावधानता आणि सुरक्षा प्रक्रियेचे पालन केल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनीही या अनुभवातून भीती व्यक्त केली असून, विमान कंपन्यांनी हवामानाच्या इशाऱ्यांबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.