दिलासादायक ! डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार

demu train pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यातलं दुसरं मोठं शहर म्हणून पुण्याचा उल्लेख केला जातो. नोकरी शिक्षण याकरिता पुण्यामध्ये येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यातच पुणे शहरापासून आजूबाजूच्या परिसरातून देखील लोक दररोज कामानिमित्त पुण्यात येत असतात. दौंड ते पुणे असा प्रवास हजारो प्रवाशांकडून केला जातो. याच प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. खरं तर दौंड ते हडपसर या मार्गावर डेमू ट्रेन धावते. आता ही ट्रेन पुण्यापर्यंत धावणार आहे. त्यामुळे दौंड वरून पुण्यापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यापूर्वी ही ट्रेन केवळ हडपसर पर्यंतच धावत होती. त्यामुळे पुन्हा हडपसर वरून पुण्यामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत होती. मात्र आता ही डेमू ट्रेन थेट पुण्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांनी डेमू ट्रेन हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर ही प्रवाशांची मागणी मान्य केली गेली आहे. त्यामुळे दौंड ते हडपसर ही डेमू ट्रेन आता पुणे रेल्वे स्थानकांपर्यंत धावणार आहे. याबाबतची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना कुल यांनी सांगितले की, दौंड स्थानकावरून सकाळी 6:10 वाजता सुटणारी 01522 डिझेल (DMU LOCAL) रेल्वे हडपसर (मुंढवा) पर्यंतच असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. ही डेमू हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. आता 01522 रेल्वे ही गाडी दौंड स्टेशन वरून सकाळी 6:05 वाजता सुटेल.आता 01522 रेल्वे ही गाडी दौंड स्टेशन वरून सकाळी 6:05 वाजता सुटेल.

याबाबत रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेच्या दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी दौंड रेल्वे स्टेशन येथे भेट दिली त्यावेळी केली होती, तसेच आपण याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. 01522 – दौंड – हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेण्याची मागणी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेकडे दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने तसेच प्रवाशांच्यावतीने आभार मानतो. असे कुल म्हणाले.