Devbagh Beach : कोकणातील संगम सिगल बेट पाहिलाय का? इथं नदी आणि समुद्र होतो एकरुप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Devbagh Beach) उन्हाळा म्हटला की घामाघूम होणं आलंच. सूर्य पण असा राग काढत असतो जसे काय आपण जानी दुश्मनचं! गेल्या काही दिवसांत तापमानातील उष्णता इतकी वाढली आहे की, कुठेतरी लांब थंड प्रदेशात फिरायला जावं असं वाटू लागलं आहे. पण कामाच्या व्यापात लांब कुठेतरी जाणं शक्य नाही. असे असले तरीही उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना सुट्टी असते. मग एक तरी छोटी पिकनिक होतेच. तुम्हीही अशा पिकनिकची तयारी करत असाल तर कोकणात फिरायला जा.

येवा कोकण आपलोच असा!! म्हणतात ते उगाच नाही. इथलं नैसर्गिक सौंदर्य, लांब समुद्रकिनारे, आंब्याच्या काजूच्या बागा आणि खाद्य संस्कृतीबद्दल बोलू तितकं कमीच!! मासे प्रेमींसाठी तर कोकण म्हणजे अहाहा!! अशा कोकणाचे सौंदर्य पुरेपूर पाहायचे असेल आणि इथल्या खाद्य संस्कृतीचा मस्त आस्वाद घ्यायचा असेल तर कोकणातील देवबाग (Devbagh Beach) या ठिकाणी जरूर जा. इथे गेल्यावर कुठे रहाल? कुठे फिराल? आणि काय खाल? याची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

देवबाग (Devbagh Beach)

कोकणातील देवबाग हे असे ठिकाण आहे जिथे फिरायला जाणे अत्यंत आनंददायी आहे. वाटेत लागणारा तारकर्ली बीच अत्यंत सुंदर आणि पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथल्या वाळूत सापडणारे शंख- शिंपले आणि छोटे- छोटे खेकडे आपले लक्ष वेधून घेतात. तसेच इथे वॉटर स्पोर्ट्समध्ये स्नोकर्लिंग, कयाकिंग, जेट स्की राईड, बम्पर राईड, पॅरासेलिंग, बनाना राईड, बनाना, स्कूबा डायव्हिंग यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.

तर देवबाग बीचचा (Devbagh Beach) समुद्र किनारा लांब आणि चमकत्या पांढऱ्या वाळूचा असल्याने विशेष ठरतो. याठिकाणी बोटीतून खाडीत नेले जाते आणि इथून वेगवेगळी ठिकाणे दाखवली जातात. बोटीतून समुद्र न्याहाळणे फारच आनंददायी वाटते. याठिकाणी पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. यामध्ये देवबाग संगम पॉईंट फार खास आहे.

संगम पॉईंट

देवबागच्या नीरव शांततेतील देवबाग आणि कर्ली नदीच्या संगमाचे ठिकाण ‘डेल्टा पॉईंट’ म्हणून ओळखले जाते. अरब समुद्रात जाऊन मिळणाऱ्या कर्ली नदीचा संगम या ठिकाणी पहायला मिळतो.

सनसेट पॉईंट

देवबागच्या बीचवर बोटीतून कर्ली नदीच्या खाडीत गेल्यावर सुंदर असा सनसेट पॉईंट पहायला मिळतो. (Devbagh Beach) सभोवतालचा निसर्ग आणि पाण्यात पडणारी सुर्याची किरणे पाहून एक वेगळाच अनुभव मिळतो.

भोगवे बीच

देवबाग बीचवर बोटीतूनच भोगवे समुद्र पाहता येतो. हा बीच लागून असल्याने देवबागनंतर भोगवे बीचलादेखील भेट देता येते.

कर्ली नदी खाडी

देवबागच्या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे कर्ली नदी. (Devbagh Beach) ही नदी थेट अरबी समुद्राला येऊन मिळते. ही खाडी पाहिल्यानंतर त्सुनामी आयलैंडवर नेतात. इथे खेकडे पहायला मिळतात. शिवाय माफक दरात छोट्या- छोट्या वल्ह्याच्या नौका पहायला मिळतात. ज्या तुम्ही स्वतःसुद्धा चालवू शकता.

कसे जाल?

देवबाग हे तारकर्लीपासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर आहे. फोर व्हिलर असेल तर तारकर्लीतून अगदी २० मिनिटांत देवबागला जाता येते. त्यामुळे देवबागला जाणे फारच सोपे आहे असे म्हणता येईल.

कुठे राहाल?

देवबागला फिरायला जात असाल तर राहण्याची चिंता करू नका. (Devbagh Beach) इथे अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. शिवाय लक्झरी हॉटेलच्या देखील सुविधा आहेत. बीचसमोर अनेक कॉटेजेस किवा हॉटेल्स आहेत. जिथे अगदी माफक दरात राहता येते.

काय पहाल?

देवबागमध्ये पाहण्यासारखे बरेच पॉईंट आहेत. त्यामध्ये कर्ली नदीचा संगम पॉईंट, त्सुनामी आयलैंड, मिनी केरळ, भोगवे बीच, कर्लीची खाडी हे पाहण्यासारखे स्पॉट आहेत. तसेच इथे सीगल पक्षीदेखील पहायला मिळतात.

काय खाल?

देवबागला मच्छि प्रेमींची तर चंगळ असते. त्यामुळे खवय्ये एकदम खुश असतात. खरतर इथे व्हेज आणि नॉनव्हेजची चांगली सुविधा आहे. त्यामुळे शाकाहारी लोकांना देखील टेन्शन नाही. (Devbagh Beach) पण खास करून मांसाहार करणाऱ्या लोकांना मेजवानीचा फील येतो. मच्छिमध्ये सुरमई, पापलेट, बांगडा आणि अन्य प्रकारचे मासे, सुकी बोंबील, कोळंबी, सोलकढी, उकडी भात, मच्छी करी, अंडा करी, चिकन करी, तांदळाची भाकरी मिळते. तर शाकाहार करणाऱ्यांसाठी उकडीचे मोदक, उकडी भात, वरण, पापड, लोणचे, आमटी, उसळ भाजी, बटाटे भाजी, चपाती, ताक अशी मेजवानी असते.