Diesel Cars: सणासुदीच्या मुहूर्तावर जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही डिझेल वाहन खरेदी करू इच्छित असाल तर थांबा…कारण भारत सरकार डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही तर त्यासाठीची ब्लूप्रिंट देखील सरकारने तयार केली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे 2027 पासून डिझेल गाड्यांची विक्री (Diesel Cars) करता येणार नाही.
म्हणून डिझेल वाहनांवर बंदीचा निर्णय (Diesel Cars)
भारतातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढीमुळे वायू प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. हे लक्षात घेता, ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने 2027 पर्यंत सर्व डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हा या बंदीचा मुख्य उद्देश आहे. डिझेल वाहने नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक पदार्थ उत्सर्जित करतात, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते. त्यामुळे माती आणि पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे बनवत आहे आणि त्यासाठी पायाभूत सुविधाही (Diesel Cars) विकसित करत आहे.
कोणत्या शहरांत बंदी ? (Diesel Cars)
ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त आहे आणि लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्येच सरकारचा हा प्रस्ताव लागू केला जाणार आहे. यासोबतच 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहनेही या बंदीच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. ही बंदी पेट्रोलवर चालणाऱ्या काही वाहनांनाही लागू होऊ शकते.
जर तुम्ही डिझेल कार घेण्याचा विचार करत असाल, तर हे निर्बंध येत्या काळात लागू होऊ शकतात हे (Diesel Cars) लक्षात ठेवा. नुकतेच रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही डिझेल कार उत्पादकांना या गाड्यांचे उत्पादन बंद करण्याचा इशारा दिला आहे.