सोलापूरकरांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच सोलापूरकरांना थेट विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात उड्डाण होण्याची शक्यता वर्तवली जात असून सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर -मुंबई आणि सोलापूर -गोवा विमान सेवा सुरू होण्यासाठी आता मोठा अडथळा दूर झाला आहे.
होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय 91 एअरलाइन्सची विमानसेवा २० डिसेम्बर 2024 पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाण या सेवेअंतर्गत दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांच्याकडून एका माध्यमाला देण्यात आली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्न आहेत. सोलापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
कसे असेल वेळापत्रक
सोलापूर मुंबई विमानसेवा
सकाळी 9:40 वाजता विमान सोलापूरहून उड्डाण घेईल. तर हेच विमान सकाळी 10:40 वाजता मुंबईत पोहोचेल. तर मुंबई सोलापूर विमानसेवा दुपारी 12 : 45 वाजता मुंबईहून सोलापूरकरिता विमान उड्डाण घेईल आणि दुपारी 1:45 वाजता सोलापुरात पोहोचेल.
सोलापूर गोवा विमानसेवा
दुपारी 2:15 मिनिटांनी सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल. आणि दुपारी 3:15मिनिटांनी गोव्यात पोहोचेल तर गोवा ते सोलापूर सेवेसाठी सकाळी 8:10 मिनिटांनी गोव्याहून सोलापूरकरिता विमान उड्डाण करेल आणि सकाळी 9:10 मिनिटांनी सोलापुरात पोहोचेल.