हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांच्या पसंतीच्या सणांपैकी दिवाळी हा एक महत्वाचा सण आहे. या सणामुळे लोकांच्या घरचे वातावरून प्रसन्न राहते . सर्वत्र दिव्याचा प्रकाश पाहून जणू धर्तीवर देवांचेच आगमन झाले आहे असा अनुनभव मिळतो. या शुभ दिवशी भगवान गणेश आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते . भारत हा विविधतेने नटला असून , प्रत्येक राज्यानुसार , धर्मानुसार आणि परंपरेनुसार हा (Diwali 2024) सण साजरा केला जातो.
उत्तर भारतात दिवाळी (Diwali 2024)
उत्तर भारतात दिवाळी सण भगवान राम यांच्या 14 वर्षांच्या वनवासातून अयोध्या नगरीत आल्यानंतर साजरा केला होता . त्यावेळी संपूर्ण भारतीयांनी आपली घरे दिव्यांच्या प्रकाशायने उजवळली होती . तसेच रस्ते आणि गल्लीबोळामध्ये दिव्याचा उजेड दिसत होता . भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. हा काळ कार्तिक महिन्याच्या अमावस्येचा होता, ज्याला वर्षातील सर्वात काळी रात्र असे म्हटले जाते. या रात्रीचा काळोख दिव्यांनी दूर केला जातो .
इतर राज्यमध्ये दिवाळी (Diwali 2024)
उत्तर भारतात दुर्गापूजेनंतर लोक दसरा साजरा करुन दिवाळीच्या तयारीला लागतात. उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार या राज्यामध्ये सुद्धा दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते . दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पर्वाच्या दिवशी जुगार खेळण्याची आणि पार्ट्यांचे आयोजन करण्याची प्रथा आहे. या सणानंतर पुढील तीन ते चार दिवस गोवर्धन पूजा, भाऊबीज, चित्रगुप्त पूजा केली जाते . दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी येणार म्हणून दरवाजे उघडे ठेऊन झोपले जाते . या सणामध्ये लोक एकमेकांना भेटी देतात. त्याचसोबत मिठाई देऊन आनंद शेअर करतात .
काही वेगळ्या प्रथा (Diwali 2024)
काही ठिकाणी दिवाळीच्या रात्री लोक कच्चा दिवा उलट ठेवतात आणि झोपण्यापूर्वी सर्व काजल लावून झोपतात . मध्यरात्री गरिबीला घराबाहेर हाकलण्यासाठी विशेष पूजा केली जाते , ज्यामुळे घरातील दरिद्रता नष्ट होऊन देवी लक्ष्मी घरात प्रवेश करतील.