एकाच ठिकाणी करू शकता साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन

navratri
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवरात्रीचा उत्सव सुरु झाल्यापासून भाविकांची मंदिरात प्रचंड गर्दी होत आहे. अनेक भाविक दर्शनासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना दिसत आहेत. नवरात्रीच्या काळात लोक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तीपीठाना भेट देत असून , त्यामुळे तुळजापूर, कोल्हापूर , नाशिक, माहूर या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली आहे. पण काही भाविकांना एवढा प्रवास करणे शक्य नसतो , त्या भक्तांना अनेक ठिकाणी जाण्याची गरज नाही . एकाच मंदिरात तुम्ही साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेऊ शकता. तर चला पाहुयात कुठे आहे ते मंदिर .

साडेतीन शक्तीपीठे

तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवी असून ते पूर्ण शक्तीपीठ आहे. कोल्हापूर हे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे . येथे महाराष्ट्रातील महालक्ष्मी देवीचे पूर्ण शक्तीपीठ आहे. त्याचबरोबर वणी, नाशिक याठिकाणी सप्तश्रृंगी देवी पूर्ण शक्तीपीठ पाहण्यास मिळते . अर्ध शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेली रेणुका माता हि माहूर या ठिकाणी आहे.