Double Decker Bus : मुंबईत फिरताना तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर डबल डेकर बसेस दिसल्या असतील अगदी स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून या बसेस मुंबईमध्ये धावत आहेत. आता लवकरच ठाणे आणि पुणे या दोन शहरातही डबल डेकर बसेस (Double Decker Bus) धावताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…
पुण्यातही डबल डेकर (Double Decker Bus)
पुण्यामध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या भेडसावत आहे. शिवाय सध्या सुरु असलेल्या PMP ला देखील मोठी गर्दी असते. यामुळे पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक सुधारण्यासाठी प्रशासन भर देत आहे. पुणेकरांसाठी आत एक खुशखबर असून मुंबई प्रमाणेच पुण्यातही डबल डेकर (Double Decker Bus) बसेस सुरु होणार आहेत. पीएमपी संचालकांच्या बैठकीत बस खरेदीला मान्यता मिळाली आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. 100 नवीन इलेक्ट्रिक बसेसही खरेदी करणार आहे त्यातच वीस डबल डेकर बसेस असणार आहे. त्यामुळे लवकरच पुण्यातल्या रस्त्यांवर डबल डेकर बसेस धावताना दिसणार आहेत.
ठाण्याला 10 डबल डेकर (Double Decker Bus)
तर दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागात आतापर्यंत 123 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यात उर्वरित 180 बसेस घेण्यासाठी परिवहन विभागाने निविदा मागवली आहे त्यातील दहा बसेस या डबल डेकर बसेस असणार आहेत. ठाणे महापालिकेकडून ज्या परिवहन सेवेसाठी निविदा मागवण्यात आलेली आहे अशा 180 इलेक्ट्रिक एसी बस घेण्यात येणार आहेत. ठाणेकरांना डबल डेकर मिळणार आहे त्यादेखील इलेक्ट्रिक आणि एसी असतील त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास हा सुखदायक होणार आहे. दरम्यान मुंबईत 1937 पासून म्हणजेच मागच्या 87 वर्षां पासून डबल डेकर बस (Double Decker Bus) रस्त्यावर धावत आहेत तीच डबल डेकर बस आता नाविन्यतेने ठाण्यात येणार आहे.