Drinking Water : उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी ‘या’ वेळा एकदम परफेक्ट; डिहायड्रेशन टाळता येईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणी घामावाटे उत्सर्जित होते आणि पाण्याची मात्रा कमी होऊ लागते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सन स्ट्रोक आणि उष्णतेच्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात योग्य मात्रेत पाणी पिणे गरजेचे असते. तहान लागली म्हणून किंवा प्यायला हवं म्हणून पाणी पिऊ नये. तर पाणी पिण्याच्या काही निश्चित वेळा असतात त्यांचे पालन करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात कोणत्या वेळी किती आणि कसे पाणी प्यावे याबाबत अनेक तर्क लावले जातात. मात्र आज आपण याविषयी आहारतज्ञ काय सांगतात? ते जाणून घेणार आहोत.

पाणी कधी कधी प्याल? (Drinking Water)

उन्हाळ्यात डिहायड्रेशन सारखी समस्या टाळण्यासाठी पाणी कधी प्यावे याबाबत आपल्याला पूर्ण माहिती असायला हवी. कारण तहान लागल्यावसर तर सगळेच पाणी पितात. पण शारीरिक फायद्यासाठी पाणी प्यायचे असेल तर काही वेळा पाळणे गरजेचे आहे. याविषयी जाणून घेऊ.

1. सकाळी उठल्यानंतर

आहार तज्ञ सांगतात की, (Drinking Water) सकाळी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी किमान एक पूर्ण ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमचे अंतर्गत अवयव सक्रिय होतात. तसेच झोपेदरम्यान मंदावलेली चयापचय प्रक्रिया नीट सुरु होते, शरीर हायड्रेट राहतं आणि शरीरातील विषारी घटकांचे उत्सर्जन होण्यास मदत होते.

2. व्यायाम पूर्ण झाल्यानंतर

व्यायाम वा कसरत करतेवेळी आपल्या शरीरातून घाम बाहेर पडत असतो. परिणामी आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा हळू हळू कमी होते. ही मात्र भरून काढण्यासाठी व्यायाम पूर्ण झाल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होते. त्यामुळे हृदय सामान्य गतीत येते आणि स्नायूंची पुनर्प्राप्ती होते.

3. आंघोळ करण्यापूर्वी

(Drinking Water) आंघोळीआधी पाणी पिण्याविषयी अशी मान्यता आहे की, यामुळे रक्त तात्पुरते पातळ होते आणि हृदयाला रक्त पंप करणे सोपे जाते. मात्र तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर उपचारांशिवाय पर्याय नाही हे समजून घ्या.

4. जेवण्याच्या अर्धा तास आधी

तज्ञ सांगतात की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. कारण यामुळे पाचक एन्झाइम्सचे उत्पादन उत्तेजित होते. ज्यामुळे अन्न पचवण्यासाठी पोट सज्ज होते. शिवाय पाण्यामुळे काहीसे पोट भरल्यास पोर्शन कम्प्लिट साठी फायदेशीर ठरते.

5. झोपण्यापूर्वी

झोपेदरम्यान शरीरातील बऱ्याच प्रक्रिया सुरु असतात त्या पूर्ण करण्यासाठी एका विशिष्ट ऊर्जेची गरज असते. (Drinking Water) ही ऊर्जा पाण्याच्या माध्यमातून मिळते आणि म्हणून झोपण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात. शिवाय दिवसभरात जर शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघाली नसेल तर रात्री झोपण्याआधी पाणी प्यायल्याने ती कमतरता भरून निघते.

6. शारीरिक थकवा जाणवल्यास

खास करून डिहायड्रेशन झाल्यास किंवा आजारपण असल्यास शारीरिक थकवा जाणवतो. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवल्यास सगळ्यात आधी पाण्याची मात्रा भरून काढायला हवी. त्यामुळे शारीरिक थकवा, अंगातील त्राण निघून जाणे आणि आजारपणात थोड्या थोड्या वेळाने पेलाभर पाणी पित राहावे. (Drinking Water)

7. ताप वा ज्वर असल्यास

तापात शरीरातील पाणी बऱ्यापैकी कमी होते. तसेच तापामध्ये शरीरातील पेशींमध्ये पोषक तत्व आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी डिहायड्रेशन टाळायला हवे. त्यामुळे ताप असेल तर सतत पाणी पित रहावे. (Drinking Water)