Duronto Express : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! दिल्ली -मुंबई दुरांतो एक्सप्रेस कायमस्वरूपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Duronto Express : रेल्वेने मुंबई नागपूर आणि नागपूर ते मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांकरिता एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस (Duronto Express) आता कायमस्वरूपी धावणार आहे. याबरोबरच या गाडयांना एक जादा थर्ड एसी डब्बा सुद्धा जोडला जाणार आहे . त्यामुळे सध्याच्या कडक उन्हाळयात रेल्वेचा हा प्रवास सुखदायक होणार आहे.

गाडीला मिळतोय चांगला प्रतिसाद (Duronto Express)

खरेतर मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई तसेच नागपूरहून मुंबई आणि मुंबईहून नागपूर या गाड्या (Duronto Express) प्रायोगिक तत्वावर ३१ मार्च पर्यंत सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र या गाडयांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गाड्या कायमस्वरूपी करण्यात येणार आहेत. गाड्यांना आणखी काही एसी कोच जोडून त्या कायमस्वरूपी चालविण्यात याव्या, असा प्रस्ताव रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यावर विचार विमर्श झाल्यानंतर या चारही गाड्यांना एका थर्ड एसीचा अतिरिक्त कोच जोडून त्याला ३१ मार्चनंतरही कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.

१ एप्रिल पासून या गाड्या सुटणार

नव्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक २२२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन (Duronto Express) राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ एप्रिल पासून चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक २२२२२ हजरत निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -राजधानी एक्स्प्रेस दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकातून २ एप्रिल पासून चालवण्यात येईल.त्याचप्रमाणे १२२८९ नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस नागपूर स्थानकावरून १ एप्रिल पासून चालविण्यात येईल. तर १२२९० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २ एप्रिल पासून चालविण्यात येणार आहे.