Electric Car: 1000 KM रेंज वाली इलेक्ट्रिक कार; मार्केट मध्ये घालणार धुमाकूळ

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Car भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये लेक्ससने आपली नवीन इलेक्ट्रिक कार LF-ZC चे प्रदर्शित केली असून, ती ग्राहकांमध्ये खूपच आकर्षक ठरली आहे. या कारची रेंज ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, LF-ZC एकदाच चार्ज केल्यानंतर 1000 किलोमीटर पर्यंत धावते, ज्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये एक नवीन रेकॉर्ड सेट झाला आहे. तर चला या दमदार आणि आकर्षक फीचर्सच्या LF-ZC कारबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अत्यंत आधुनिक आणि लक्झरी (Electric Car)

LF-ZC चं इंटीरियर्स डिझाइन अत्यंत आधुनिक आणि लक्झरी आहे. या कारमध्ये प्रवाशांना एका प्रायव्हेट जेटप्रमाणे आरामदायक आणि उच्च दर्जाचा अनुभव मिळतो. कारमध्ये प्रत्येक सुविधेचा समावेश आहे, जो एखाद्या लक्झरी कारमध्ये असावा लागतो. तसेच नवीन बॅटरी तंत्रज्ञानामुळे या कारची रेंज इतकी जास्त आहे, आणि ती अत्यंत शक्तिशाली आहे. LF-ZC च्या मदतीने तुम्ही कमी वेळात ताशी 100 किमी गती गाठू शकता. कारमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात ऑटोमॅटिक पार्किंग, प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांचा समावेश होतो. LF-ZC फक्त एक इलेक्ट्रिक कार नाही, तर ती इलेक्ट्रिक कारच्या भविष्याचा एक आदर्श ठरते.

एक मोठं पाऊल –

लेक्ससच्या (Electric Car) या नवीन कारने नवी स्टँडर्ड्स (standards) निश्चित केली आहेत आणि ते इलेक्ट्रिक कार क्षेत्रात पुढे जाण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. LF-ZC च्या सादरीकरणाने भारतात इलेक्ट्रिक वाहने घेण्याच्या प्रवृत्तीस आणखी बळ मिळालं आहे. या कारच्या आकर्षणामुळे अनेक ग्राहकवर्गांचे लक्ष कारकडे असताना दिसत आहे. या गाडीमुळे प्रवास अगदी सुलभ आणि आरामदायी होणार आहे.

हे पण वाचा : DeepSeek म्हणजे नेमकं आहे तरी काय? अमेरिकेचा बाजार कसा उठवला?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज