सरकारच्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (ELI स्कीम) चा लाभ घेण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांनी त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि आधार त्यांच्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी, आता EPFO सदस्यांसाठी, विशेषत: नवीन कर्मचाऱ्यांसाठी २ दिवस शिल्लक आहेत. तुम्ही नुकतीच एखाद्या कंपनीत नोकरी सुरू केली असेल, तर १५ जानेवारीपर्यंत तुमचा UAN क्रमांक सक्रिय करा. याशिवाय बँक खात्याशी आधार लिंक करणेही आवश्यक आहे.
EPFO ने UAN सक्रिय करण्याची आणि बँक खाते आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी UAN सक्रिय करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 होती, जी नंतर 15 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली.
ELI योजना काय आहे?
सरकारने बजेट-2024 मध्ये ELI योजना जाहीर केली होती. या योजनेत 3 प्रकारच्या योजनांचा समावेश आहे, A, B आणि C. या तीनही योजनांचा उद्देश रोजगार निर्मितीला चालना देणे आणि नवीन कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.
UAN क्रमांक कसा ऍक्टिव्हेट कराल ?
- सर्वप्रथम EPFO वेबसाइट epfindia.gov.in वर जा.
- आता डावीकडे दिसणाऱ्या सेवा विभागात कर्मचाऱ्यांसाठी क्लिक करा.
- डावीकडील सर्व्हिसेस कॉलममधील दुसऱ्या स्थानावर दिसणाऱ्या सदस्य UAN ऑनलाइन सेवा OCS OTCP वर क्लिक करा.
- यानंतर सक्रिय UAN वर क्लिक करा.
- आता 12 अंकी UAN आणि आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर, कॅप्चा कोड इत्यादी भरा.
- यानंतर खाली दिलेल्या घोषणेच्या चेक बॉक्सवर क्लिक करा. आता खाली दिसलेल्या Get Authorization Pin बटणावर क्लिक करा.
- आता OTP भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमचा UAN सक्रिय झाला आहे.