Emergency in PoK : भारताकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी पाकिस्तान सरकारने पीओकेमध्ये अधिकृतपणे ‘आपत्कालीन परिस्थिती’जाहीर केली. या निर्णयामुळे संपूर्ण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, लष्कराने थेट नागरी सुविधांवर कब्जा मिळवण्यास (Emergency in PoK ) सुरुवात केली आहे.
सरकार हादरलं (Emergency in PoK )
पुंछ आणि पहलगाममधील हालचालींनंतर भारताच्या संभाव्य कारवाईची दहशत PoK प्रशासनात खोलवर भिनली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संपूर्ण नियंत्रण रेषेवर (LoC) सैन्याची अधिकृत तैनाती वाढवली असून, युद्धसदृश तयारी सुरू केली आहे. युद्धजन्य स्थितीची भीती लक्षात घेता सरकारने तातडीने आपत्कालीन आर्थिक निधी तयार केला असून, सुमारे १ अब्ज रुपये राखीव ठेवले आहेत.
हॉटेल्स, गेस्टहाऊसेस आणि मदरशांवर थेट लष्कराचा ताबा
सैन्याला निवासाची सोय व्हावी यासाठी स्थानिक हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, आणि मंगल कार्यालयांचा जबरदस्तीने ताबा घेतला गेला आहे. या मालमत्तांचे मालक सरकारच्या दबावाखाली असल्याचे बोललं जात आहे. या वास्तू सैनिकी ठाण्यांमध्ये रुपांतरित करण्यात येत आहेत.
धार्मिक कार्यक्रम, शिक्षण संस्थांना ‘ब्रेक’
राज्यातील सर्व प्रमुख मदरशांमध्ये पुढील 10 दिवसांसाठी कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी (Emergency in PoK ) घालण्यात आली आहे. सरकारच्या मते, हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, मात्र धार्मिक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
पर्यटन क्षेत्र ठप्प, नीलम खोऱ्यात प्रवेशबंदी
पीओकेमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळं नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि लिपा व्हॅली – येथे पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. गुरुवारी मार्बल चेकपोस्टवरून अनेक पर्यटकांना परत पाठवण्यात आलं. संपूर्ण भागात ‘रेड अलर्ट’ लागू करण्यात आला असून, संवेदनशील भागांमध्ये नागरिकांची हालचालही नियंत्रणात (Emergency in PoK ) ठेवण्यात येत आहे.
हवाई क्षेत्रही मर्यादित
फक्त जमीनीवरच नव्हे तर आकाशातही युद्धसदृश तयारी सुरू आहे. कराची आणि लाहोरमधील हवाई क्षेत्र दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सैनिकी उड्डाणांना प्राधान्य देण्यासाठी घेतल्याचं मानलं जातं.
PoK मध्ये जनतेचा संताप आणि घबराट
पीओकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराविरोधात जनतेचा वाढता असंतोष दिसून येतोय. अन्नधान्याची कमतरता, प्रशासनाचा निष्क्रियपणा आणि आर्थिक अडचणींमुळे जनता आधीच संतप्त आहे. आता आणीबाणीच्या घोषणेमुळे स्थानिक लोकांमध्ये अजूनच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भारताकडून कारवाईची शक्यता? (Emergency in PoK )
भारताने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी पुंछ हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी हालचालींनी पाकिस्तानची चिंता वाढवली आहे. गुप्तचर अहवालांनुसार, भारत पीओकेमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांवर कारवाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या संपूर्ण पीओके भागात तणाव, घबराट आणि युद्धजन्य तयारीचं चित्र दिसून येत आहे. पर्यटन, शिक्षण, धार्मिक जीवन पूर्णपणे ठप्प असून, लष्कराने नागरी जीवनावर पूर्ण ताबा घेतलाय. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा उधळण्याच्या मार्गावर असल्याचं संकेत दिसत आहेत.




