हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (EPF Balance) जर तुम्ही EPF खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. EPFO ने २०२३- २४ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात भविष्य निर्वाह निधीसाठी व्याजदर जाहीर केला होता. जो गतवर्षी ८.१५% होता. हाच व्याजदर सुधारित स्वरूपात ८.२५% इतका झाला आहे. दरम्यान, EPF खातेधारक फेब्रुवारी २०२४ पासून आपल्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित होण्याची वाट पाहत आहेत. EPFO ने खातेधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीही EPF खातेधारक असाल तर व्याजाचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का? हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तपासू शकता. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ज्याविषयी जाणून घेऊया.
ऑनलाईन पद्धतीने EPF बॅलन्स कसा चेक कराल? (EPF Balance)
ऑनलाईन पद्धतीने EPF बॅलन्स चेक करायचा असेल तर त्यासाठी २ पद्धतींचा वापर करता येईल. एकतर मान्यताप्राप्त अधिकृत संकेतस्थळ आणि दुसरे म्हणजे उमंग ॲप. यातील संकेतस्थळावरून बॅलन्स चेक कसा करावा ते आधी जाणून घेऊया.
1. अधिकृत संकेतस्थळ
- सगळ्यात आधी अधिकृत EPFO सदस्य पासबुक पोर्टलला भेट द्या.
- यामध्ये तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.
- यानंतर तुम्हाला पहायचे असलेले पीएफ खाते निवडा. (EPF Balance)
- पुढे सर्व व्यवहारांसाठी View PF पासबुक वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर तुमच्या EPF खात्यातील बॅलन्स दिसेल.
2. उमंग ॲपचा वापर
भारत सरकारने लाँच केलेले उमंग ॲप हे शासनाचे मोबाइल ॲप आहे. ज्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या गरजांशी संबंधित माहिती मिळते. शासनाने असे बरेच ॲप्स तयार केले आहेत. यातील हा ॲप EPF बॅलन्स चेक करण्यासाठी मदत करतो. याकरता खालील स्टेप्स फॉलो करा. (EPF Balance)
- सर्वात आधी UMANG ॲप आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करा.
- यानंतर ॲप ओपन करा आणि EPFO वर जा.
- आता यामध्ये साइन इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाका.
- लॉग इन होताच तुम्हाला तुमची ईपीएफ शिल्लक आणि इतर माहिती मिळेल.
ऑफलाईन पद्धतीने EPF बॅलन्स कसा चेक कराल?
ऑनलाईन प्रमाणेच EPF बॅलन्स चेक करण्यासाठी २ ऑफलाइन पद्धतीदेखील आहेत. यातील पहिली एसएमएस आणि दुसरी मिस्ड कॉल. याविषयी जाणून घेऊया.
3. एसएमएस (SMS)
तुम्ही तुमच्या EPF अकाउंटचा बॅलन्स ऑफलाईन पद्धतीने देखील चेक करू शकता. यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल फोन नंबरशी जोडलेला हवा. (EPF Balance) तुमच्या मोबाईलवरून 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून तुम्ही तुमचा EPF खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्ही तुमची भाषा देखील निवडू शकता आणि SMS पाठवल्यावर काही सेकंदात, तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लकबाबत माहिती मिळेल.
4. मिस्ड कॉल (Missed Call)
जर तुम्ही तुमच्या EPF खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) नोंदणीकृत मोबाईल नंबरशी जोडलेला असेल, तर मिस्ड कॉलच्या माध्यमातून देखील तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित माहिती मिळवता येते. (EPF Balance) यासाठी तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. यानंतर तुमचा कॉल आपोआप डिस्कनेक्ट होतो आणि तुम्हाला SMS येतो. ज्यामध्य तुमच्या EPF खात्याची माहिती लिहिलेली असते.