हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (EPFO Auto Claim Settlement) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या खाते धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकतीच EPFO ने एका मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. EPFO स्कीम १९५२ अंतर्गत ऑटो क्लेम सेटलमेंट सेवा सुरू करण्यात आली असून आता मानवी हस्तक्षेपाशिवाय केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व दावे निकाली लावले जाणार आहेत. परिणामी, EPFO खातेदारांचे दावे निकाली काढण्यासाठी आधीपेक्षा आता कमी वेळ लागेल. इतकेच नव्हे तर शिक्षण, विवाह आणि घरांच्या दाव्यांसाठीदेखील ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू करण्यात आले आहे.
यानुसार, ईपीएफ स्कीम १९५२ अंतर्गत ईपीएफओनं घरं, विवाह आणि शिक्षणासाठी ऑटो क्लेम सेटलमेंट सुविधेची व्याप्ती वाढवली आहे. (EPFO Auto Claim Settlement) इतकंच नाही तर ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा सध्या ५० हजार रुपये इतकी होती. जी नव्या बदलानुसार १ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. याबाबत कामगार मंत्रालयाने सोमवारी सविस्तर माहिती प्रदान केली आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊ.
EPFO ची शिक्षण, लग्न आणि निवासासाठी ऑटो अॅडव्हान्स सुविधा
EPFO मार्फत घर, विवाह आणि शिक्षणासाठी ऑटो अॅडव्हान्स सुविधा सुरु केली आहे. आर्थिक वर्ष २०२३- २४ मध्ये निकाली काढलेल्या आगाऊ दाव्यांपैकी ८९.५२ लाख दावे हे ऑटो मोडअंतर्गत निकाली काढले गेले होते. यानंतर आता EPF स्कीम १९५२ अंतर्गत ऑटो क्लेम सुविधा पॅरा ६८ के (शिक्षण, विवाह) आणि ६८ बी (घर) पर्यंत वाढविण्यात आले आहे.
मानवी हस्तक्षेप होणार नाही (EPFO Auto Claim Settlement)
याआधी ऑटो सेटलमेंटसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज होती. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही. केवायसी, पात्रता आणि बँक व्हॅलिडेशनद्वारे केले जाणारे दावे आता आयटी टूल्सद्वारे प्रोसेस केले जाणार आहेत. त्यामुळे आगाऊ क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा वेळ हा १० दिवसांवरून थेट ३- ४ दिवसांवर येईल.
रिटर्न/रिजेक्ट क्लेम होणार नाही
लक्षात घ्या, आयटी प्रणालीचा वापर करून अॅडव्हान्ससाठी क्लेम सेटलमेंट न केल्यास तो रिटर्न किंवा रिजेक्ट केला जाणार नाही. तर हा दावा दुसऱ्या स्तरावर स्क्रूटनी आणि अप्रुव्हलद्वारे निकाली काढण्यात येईल. (EPFO Auto Claim Settlement) दरम्यान, या सुविधेचा विस्तार पाहता घर, लग्न आणि शिक्षणासाठी ऑटो क्लेमची सुविधा ईपीएफओ सदस्यांना कमी कालावधीत निधी उपलब्ध करून देईल. अर्थात EPFO च्या ऑटो क्लेमनंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील. ज्यामुळे सदस्यांना लवकरात लवकर निधी मिळेल.