हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (EPFO Updates) नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर भविष्यात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू नये म्हणून EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत गुंतवणूक केली जाते. आज अनेक लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत. निवृत्तीनंतर या योजनेत गुंतवलेली रक्कम त्या कर्मचाऱ्याला पेन्शन स्वरूपात मिळत असते. त्यामुळे निवृत्तीनंतरही आर्थिक सुरक्षितता मिळते.
दरम्यान, EPFO खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (EPFO Updates) नुकतीच EPFO तर्फे अत्यंत महत्वाची अशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, आता EPFO खातेधारकांना तब्बल ५० हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे. आता हा लाभ कसा मिळेल याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. ल.
EPFO देणार ५०,०००/- रुपयांचा अतिरिक्त लाभ
EPFO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना यातून मिळणाऱ्या सुविधांची पूर्ण माहिती असायला हवी. मात्र अनेकांनी यातून मिळणारे लाभ आणि त्यासाठीचे नियम यांची माहिती नसते. (EPFO Updates) असेच काहीसे लॉयलिटि कम लाईफ बेनिफिट्स या नियमाबाबत आहे. या नियमनुसार, EPFO च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. मात्र तो कसा मिळवायचा? यासाठी काही नियम आहेत. ते पाळायला हवेत. हा लाभ मिळवण्यासाठी एका अटींची पूर्तता करावी लागते. ती अट कोणती? याविषयी जाणून घेऊ.
EPFO ची अट
EPFO च्या अटीनुसार, कितीही वेळा नोकरी बदलली तरी सतत २० वर्षे एकाच EPF खात्यात गुंतवणूक करणाऱ्या खातेधारकालाच ५० हजार रुपयांचा लाभ मिळेल. याचा अर्थ असा की, कोणत्याही कारणास्तव सतत EPF खाते बदलता काम नये. सलग २० वर्षे खातेधारकाने आपले खाते न बदलल्यास त्याला हा अतिरिक्त लाभ मिळेल.
नेमका फायदा कोणाला मिळणार? (EPFO Updates)
EPFO च्या लॉयल्टी-कम-लाईफ या सुविधेचा फायदा देशातील त्या लोकांना मिळेल ज्यांचे मूळ वेतन (बेसिक सॅलरी) ५ हजार रुपयांपर्यंत आहे. अशा खातेधारकांना ३० हजार रुपये लॉयल्टी-कम-लाईफ मिळेल. तसेच ज्या लोकांचे मूळ वेतन ५,००१/- ते १०,०००/- रुपये इतके आहे त्यांना ४० हजार रुपये दिले जातील. याशिवाय ज्या लोकांचे मूळ वेतन १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या नियमाअंतर्गत ५० हजार रुपयांचा लाभ मिळेल.