हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या ‘घिब्ली’ ट्रेंड जोरात चर्चा करत आहे. पण, या ट्रेंडसंदर्भात डिजीटल प्रायव्हसीसंदर्भातील तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, या ट्रेंडमुळे ओपन एआय एआय ट्रेनिंगसाठी लाखो लोकांचे खासगी फोटो जमा होऊ शकतात. ‘घिब्ली’ (Ghibli)ट्रेंडमध्ये, अनेक वापरकर्ते आपल्या फोटोचा कार्टून स्वरूपात रूपांतरण करून ऑनलाइन पोस्ट करत आहेत. मात्र, यामुळे त्यांचे खासगी फोटो ओपन एआयसारख्या कंपन्यांच्या डेटाबेसमध्ये जाऊ शकतात, ज्याचा वापर भविष्यकाळात नोंदवलेल्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भविष्यात अडचणी निर्माण होणार ?
GDPR (‘जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन’) यासारख्या नियमांनुसार, जेव्हा वापरकर्ते स्वतःहून एआयवर फोटो अपलोड करतात, तेव्हा ते फोटो वापरण्याचा अधिकार कंपन्यांना देतात. यामुळे ओपन एआयला अपलोड केलेल्या फोटोंवर कायदेशीर हक्क मिळतो , असे ‘टेक आणि प्रायव्हसी अकादमी’च्या सहसंस्थापक लुईझा झालोव्हास्की यांनी ट्विटरवर सांगितले. तसेच या नव्या तंत्रज्ञानामुळे AI द्वारे तयार करण्यात आलेले फोटो कंपन्यांच्या मालकीचे होऊ शकतात, ज्यामुळे कार्टून कलाकारांसाठी अन इतर संबंधित व्यक्तींना भविष्यकाळात उपजीविकेसाठी अडचणी येऊ शकतात. हा ट्रेंड फोटो अपलोड करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा कायदेशीर धोका बनू शकतो.
तंज्ञांचा इशारा –
‘घिब्ली’ ट्रेंडच्या अंतर्गत, जेव्हा वापरकर्ते फोटो अपलोड करतात, तेव्हा या कंपन्यांना त्यांच्या खासगी फोटो आणि डेटा गोळा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ह्या फोटोंचा मूळ स्रोत कंपनीच ठरवते आणि त्यामुळे वापरकर्त्यांच्या फोटोंवर पूर्वपरवानगीशिवाय कंपनी कोणत्याही प्रकारे वापर करू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.