Expressway: मुंबई -पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने होणार कमी ; बनणार राज्यातील सर्वात लांब बोगदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Expressway: मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते तर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर सध्या नोकरीसाठी सुद्धा पसंतीचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे तितकीच महत्त्वाची आहेत आणि या दोन्ही शहरांना एकमेकांशी जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे अशी दररोज सफर करणाऱ्या प्रवाशांची या रस्त्यावर काही कमी नाही. याशिवाय व्यापारी आणि इतर कारणांसाठी देखील या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते.

मात्र मागच्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असल्यामुळे बऱ्याचदा इथे ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसी ने खंडाळा घाटात 13.3 किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक मार्ग’ बनवण्याचं काम हाती घेतले आहे. चला जाणून घेऊया या (Expressway) मार्गाबद्दल…

पुणे-मुंबई प्रवास अर्ध्या तासाने कमी (Expressway)

खंडाळा घाटात होत असलेल्या मिसिंग लिंक मार्गामुळे पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास हा अर्ध्या तासाने कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मिसिंग लिंक वर 1.75 किलोमीटर आणि 8.93 किलोमीटरचे दोन बोगदे केबल स्टेड पूल उभारले जाणार आहेत. केबल स्टेड पुलाचं काम अद्याप सुरू असून बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या बोगद्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास याची लांबी जवळपास नऊ किलोमीटर असल्याने तो राज्यातील सर्वात लांबीचा बोगदा ठरणार असल्याची माहिती एमएसआरडीसी च्या एका वरिष्ठ (Expressway) अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

काय आहे या बोगद्याची वैशिष्ट्य ? (Expressway)

या बोगद्याची लांबी 8.93 किलोमीटर असेल, तर रुंदी 21.5 मीटर असेल, या बोगद्याची उंची ही 11 मीटर असून यावरचा जो मार्ग आहे हा चार पदरी मार्ग असणार आहेत. तर हा बोगदा तयार करण्यासाठी ड्रिल अँड ब्लास्ट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यातील सर्वात लांब बोगदा (Expressway)

आता देशातील सर्वात मोठा बोगदा कोणता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर देशातील महामार्गावरील सर्वात लांब बोगद्यांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर जम्मू कश्मीरमधील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी हा बोगदा असून त्याची लांबी 9.28 किलोमीटर (Expressway) आहे. राज्यातील बोगद्यांच्या बद्दल बोलायचं झाल्यास समृद्धी महामार्गावरील कसारा घाटातील नुकताच पूर्ण करण्यात आलेला बोगदा आठ किलोमीटर लांबीचा आहे. हा बोगदा राज्यातील सर्वात लांब बोगदा आहे. मात्र पुढील काही महिन्यात ‘मिसिंग लिंक’ वरील 8.93 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण होणार असल्याने तो राज्यातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे