Expressways : मुंबईत मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मेट्रो, बुलेट ट्रेन, अटल सेतू, कोस्टल रोड अशी अनेक प्रकल्प आहेत. ज्याच्यामुळे मुंबईच्या विकासात भर पडणार आहे. शिवाय मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी राज्यातील इतर महत्वाची शहरं मुंबईशी जोडण्यासाठी महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा असणारा हा प्रकल्प असून यातील शेवटचा टप्पा खुला होण्याचा बाकी आहे. या महामार्गाबाबत मोठी (Expressways) अपडेट समोर आली आहे.
या महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. यानंतर (Expressways) शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा 2023 मध्ये सुरू झाला. यानंतर भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा 2024 मध्ये वाहतुकीसाठी सुरू झाला. आता या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे अर्थातच इगतपुरी ते आमने हे 76 किलोमीटर लांबीचे काम सुरु आहे. या शेवटच्या टप्प्याचे काम देखील 98 टक्के पूर्ण झाले आहे. अर्थातच लवकरच संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हे काम विधानसभा निवडणुकाकांच्या (Expressways) आधी पूर्ण होणार आहे असा दावा केला जातो आहे.
मुंबई ते नागपूर गाठणार ८ तासात (Expressways)
सप्टेंबरमध्ये इगतपुरी – आमणे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आणि आमणे – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी दरम्यानचा जोडणी मार्ग सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहेत. म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच नागपुर ते मुंबई अन मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.