Fact Check : तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर सरकार देतेय 4.78 लाखांचे कर्ज, जाणून घ्या सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fact Check : भारतात लोक कर्ज घेण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि हे कर्ज सरकार देत असेल तर लोक काहीही करायला तयार असतात, जरी सरकारने दिलेल्या कर्जासाठी अनेक अटी असतात. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये सरकार आधार कार्डवर 4,78,000 रुपये कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हि गोष्ट खरी आहे कि खोटी याबाबत कधी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? नसेल तर याबाबतची सत्यता जाणून घेऊया

सोशल मीडियावर काय दावा केला जातोय ? Fact Check

व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये सरकारकडून 4.78 लाख रुपयांचे कर्ज मिळत असल्याचा दावा (Fact Check) केला जात आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना हे कर्ज मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खरा मानला तर देशातील १३७.९ कोटी आधार कार्डधारकांना ४.७८ लाख रुपयांचे कर्ज मिळेल.

या दाव्यावर सरकार काय म्हणाले?

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमने एक्स वर पोस्ट करताना म्हटले आहे की सरकारच्या नावाने केला जात असलेला हा दावा (Fact Check) पूर्णपणे खोटा आहे. सरकार असे कोणतेही कर्ज देत नाही. अशा संदेशांना बळी पडू नका आणि संदेशासह प्राप्त झालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करून कोणतेही ॲप डाउनलोड करू नका किंवा तुमची बँक माहिती कोणाशीही शेअर करू नका. आधार कार्ड कोणालाही देऊ नका.