Fastag KYC : FASTag युजर्स, 1 एप्रिलआधी ‘हे’ काम करा नाहीतर टोलवर होईल मनस्ताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fastag KYC) देशभरात फास्टॅगमुळे महामार्गावरील टोल गोळा करणे सोपे झाले असून. आता प्रत्येक चारचाकी वाहनधारकाकडे चालू फास्टॅग असणे गरजेचे आहे. ही कर गोळा करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. यामध्ये वाहनावर लावलेला कोड स्कॅन होतो आणि त्यानंतर वाहनधारकाच्या अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले जातात. दरम्यान फास्टॅग वापर्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट केले नसेल तर तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. कारण, जर तुम्ही तुमच्या कारचे फास्टॅग केवायसी अपडेट केलेले नसेल तर लवकरच तुमचे फास्टॅग निष्क्रिय होऊ शकते.

शेवटची तारीख

टोल प्लाझावर फास्टॅग वापरणाऱ्यांनी आपल्या कारचे फास्टॅग केवायसी (Fastag KYC) केले नसेल तर त्यांच्याकडे फक्त आणि फक्त ६ तर ७ दिवस बाकी आहेत. येत्या ३१ मार्च २०२४ नंतर केवायसी अपडेट केले नसेल तर तुमचे फास्टॅग निष्क्रिय केले जाईल किंवा बँकेद्वारे ब्लॅकलिस्टेड केले जाईल. त्यामुळे, ही तारीख उलटून गेली तर तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स असूनही तुम्हाला टोलवर पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी अपडेट करून घ्या. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. आता ते कसे? हे जाणून घेऊ.

ऑनलाईन किंवा ऑफलाईन (Fastag KYC)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI च्या नियमांनुसार NHAI ला फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी आपले फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्टेड होणार नाही यासाठी ३१ मार्च २०२४ आधी केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ऑनलाईन पद्धतीने फास्टॅग केवायसी

यासाठी सर्वात आधी तुम्हाला फास्टॅगच्या अधिकृत वेबसाइट fastag.ihmcl.com वर भेट द्यावी लागेल. यानंतर केवायसी हा पर्याय निवडा. आता Customer Type वर क्लिक करा. (Fastag KYC) यानंतर Declaration बॉक्सवर क्लिक करा. आता केवायसी अपडेट प्रक्रियेसाठी पुढे जा. समोर आलेल्या पेजवर आवश्यक कागदपत्रे दाखल करा. उदा., पत्ता पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमचा पूर्ण पत्ता. माहिती सबमिट करण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक तपासा आणि त्यानंतर सबमिट करा.

ऑफलाईन पद्धतीने फास्टॅग केवायसी

यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. सोबत पॅन कार्ड, पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे ठेवावीत. यानंतर बँकेतून फास्टॅग केवायसी फॉर्म घ्या आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा. तुम्ही सबमिट केलेल्या फॉर्म आणि कागदपत्रांची बँकेकडून पडताळणी केली जाईल. यानंतर संबंधित व्यक्तीला ईमेल आणि एसएमएसद्वारे अप्रूव्हलची सूचना दिली जाते. (Fastag KYC)