Fasting Dhokla : खिचडी खाऊन बोअर झालात ? ट्राय करा ‘ही’ उपवासाची हटके रेसिपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fasting Dhokla : आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशी ही पूर्ण वर्षातली सर्वात मोठी एकादशी असते. या एकादशीला उपवास केला जातो . या उपवासाला साबूदाण्याची खिचडी, भगर, उपवासाचे पापड असे पदार्थ खाल्ले जातात. मात्र तुम्ही वारंवार उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी हटके पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत. होय …! आम्ही ज्या उपवासाच्या पदार्थाबद्दल बोलत आहोत तो पदार्थ म्हणजे उपवासाचा ढोकळा. चला तर मग जाणून घेऊया हा उपवासाचा ढोकळा (Fasting Dhokla) कसा बनवायचा.

साहित्य (Fasting Dhokla)

भगर
शाबू
मीठ
दही
इनो

कृती (Fasting Dhokla)

  • सर्वप्रथम 200 ग्रॅम भगर आणि 100 ग्रॅम साबुदाणे घ्या व दोन्ही पदार्थ वेगवेगळे वाटून घ्या साबुदाणा (Fasting Dhokla)
    व्यवस्थित बारीक दळून घ्या.
  • आता हे दोन्ही पदार्थ एकत्र करा. यामध्ये पाणी आणि दही घाला.
  • बॅटर बनवता येईल अशा पद्धतीने गरजेनुसार पाणी आणि दही तुम्हाला मिसळायचं आहे.
  • आता या मिश्रणामध्ये एक टीस्पून आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे.
  • आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
  • बॅटरची व्यवस्थित कन्सिस्टन्सी हवी असेल तर यामध्ये एक टेबलस्पून तेल घाला आणि पंधरा मिनिटांसाठी हे बॅटर तुम्ही झाकून ठेवा.
  • आता एका भांड्याला व्यवस्थित ग्रीस करून त्याला तेल लावून घ्या. दुसरीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवा पाणी उकळलं की थोड्यावेळासाठी गॅस मंद आचेवर ठेवा.
  • ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर ढोकळ्याचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या इनो घातल्यानंतर वेळ न घालवता लगेचच ढोकळ्याचा बॅटर ढवळून घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवून द्या.
  • दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवायचे आहे.
  • आता ढोकळा शिजल्यानंतर तो बाहेर काढून घ्या. त्याचे चौकोनी काप करा
  • फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली हिरवी, मिरची घाला. ही फोडणी तुम्हाला ढोकळ्यावर (Fasting Dhokla)
    ओतायची आहे आणि ढोकळा सर्व्ह करायचा आहे.