FD Interest Rate : ‘या’ बँकांनी बदलले FD वरील व्याजदर; पहा किती दिवसांच्या ठेवीवर किती परतावा मिळणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Interest Rate) आजच्या काळात नुसता पैसा कमावून उपयोग नाही. तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवता आला पाहिजे. तरच पैसा कमावल्याचे समाधान राहील. गुंतवणूक ही काळाची गरज आहे हे काही नव्याने सांगायला नको. आज प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व लक्षात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. यात अनेक गुंतवणूकदार मुदत ठेवीमध्ये गुंतवताना दिसत आहेत. जर तुम्हीही यामध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्वाची आहे.

कारण, अनेक बँकांनी मे महिन्यात FD वरील व्याजदर सुधारले आहेत. (FD Interest Rate) यानुसार काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याचे समोर आले आहे. या यादीमध्ये मोठमोठ्या बँकांच्या नावाचा समावेश आहे. एसबीआय (SBI), डिसीबी (DCB) बँक आणि आयडीएफसी (IDFC) फर्स्ट बँकेने नुकतेच एफडीवरील व्याजदर बदलले आहेत. चला तर या बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेऊ आणि त्याचा फायदा कसा होईल? हे देखील जाणून घेऊ.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI बँक)

माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ ठराविक कालावधीसाठी FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवे सुधारित दर १५ मे २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.
यानुसार, १८० ते २१० दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर २५ बेस पॉईंट्सने ६% इतका वाढवण्यात आला आहे. याआधी ५.७५% इतका व्याजदर दिला जात होता. (FD Interest Rate)
तसेच २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी व्याजदर ६% होता. तोच आता ६.२५% इतका करण्यात आला आहे.
शिवाय १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी ६.८% इतका व्याजदर लागू करण्यात आला आहे.
तर २ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FDवर ७% इतका व्याजदार दिला जात आहे.

DCB बँक (FD Interest Rate)

माहितीनुसार, व्याजदर बदलणाऱ्या बँकांच्या यादीत DCB बँकेच्या नावाचा देखील समावेश आहे. या बँकेने २२ मे २०२४ पासून नवे सुधारित दर लागू केले आहेत.
दरम्यान, DCB बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदर सुधारित केल्याचे समजत आहे.
सध्या ही बँक १९ महिने ते २० महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. सर्वसामान्यांना ८.०५% तर ज्येष्ठ नागरिकांना ८.५५% व्याजदर प्रदान केला जात आहे.

IDFC फर्स्ट बँक

आईडीएफसी फर्स्ट बँकेनेसुद्धा नवे सुधारित दर लागू केले आहेत. माहितीनुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी हे दर लागू करण्यात आले आहेत. दैनिक १५ मे २०२४ पासून हे नवे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.
सध्या IDFC फर्स्ट बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीतील FD साठी सर्वसामान्य ग्राहकांना ३% ते ७.९% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अतिरिक्त दिला जात आहे. (FD Interest Rate)
तसेच ५०० दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध असून सामान्य ग्राहकांना ७.९% व्याजदर दिला जातोय. तर ज्येष्ठ नागरिकांना ८.४% व्याजदर मिळत आहे.