Fenugreek Seeds : कडू मेथी दाणा आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या 6 मॅजिकल फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds) हिरव्या पालेभाज्यांपैकी एक मेथी ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. त्यामुळे मेथीची भाजी, भजी, पराठे असे वेगवेगळे पदार्थ आपण आहारात घेत असतो. शिवाय मेथी दाणा तर प्रत्येक स्वयंपाक घरात आढळतो. ज्याचा वापर आंबवणीचे पदार्थ तयार करताना केला जातो.

चवीला अतिशय कडू असणारा हा मेथी दाणा आरोग्याच्या दृष्टीने मात्र प्रचंड फायदेशीर आहे. मेथी दाण्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी गोळ्या- औषधं खाण्याऐवजी मेथी दाणा खाणे लाभदायी आहे. चला तर जाणून घेऊया मेथी दाणा गुणकारी कसा आहे आणि त्याचे फायदे काय?

मेथी दाण्यात आढळतात अनेक पोषक तत्वे

मेथी दाण्यात व्हिटॅमिन सी, प्रथिने, फायबर्स, लोह आणि अशा अनेक विविध प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश आहे. शिवाय अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, ‘मेथीच्या दाण्यांमध्ये सॅपोनिन आढळते. जे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथी दाण्यातील अशा विविध पोषक तत्त्वांमुळे आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर सिद्ध होतात.

मेथी दाण्याचे आरोग्यदायी फायदे (Fenugreek Seeds)

1) शरीरातील रक्त वाढीसाठी फायदेशीर

अनेकांना शरीरात रक्त कमी असल्याची समस्या जाणवते. याचे मूळ कारण आहे लोहाची कमतरता. अशावेळी मेथी दाणा फायदेशीर ठरतो. मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण असते. जर शरीरात लोहाची कमतरता असेल अशावेळी मेथी दाण्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

2) मधुमेह नियंत्रणात उपयुक्त

(Fenugreek Seeds) मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश केल्यास मधुमेहींना विशेष लाभ होतो. कारण, मेथीच्या दाण्यांमध्ये शरीरात विरघळणाऱ्या फायबर्सचा समावेश असतो. शिवाय मेथी दाण्यात असलेल्या हायपोग्लायसेमिक प्रभावामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

3) कोलेस्टेरॉल कंन्ट्रोलसाठी मदत

मेथी दाण्यांमध्ये आदळणारे नारिंगेनिन नावाचे फ्लेव्होनॉइड आपल्या रक्तातील लिपिडचे प्रमाण कमी करते. तसेच मेथी दाण्यातील अँटी- ऑक्सिडंट थेट कोलेस्ट्रॉलवर मारा करतात आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतात.

4) सांधेदुखीपासून आराम

मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, फायबर्स, फॉस्फरस आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण असते. (Fenugreek Seeds) ज्यामुळे मेथी दाण्याचे सेवन केले असता आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच मेथी दाण्यांमध्ये आढळणारे दाहक- विरोधी गुणधर्म सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करतात.

5) वजन कमी करण्यासाठी परिणामकारक

मेथी दाण्यात आढळणारे पॉलिफेनॉल्स शरीरात चरबी जमा होण्यापासून बचाव करते. ज्यामुळे वाढणारे वजन नियंत्रणात येते. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील मदत मिळते.

6) लैंगिक समस्या दूर करण्यास सक्षम

मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारे सॅपोनिन पुरुषांमध्ये आढळणारे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्समध्ये उत्तेजना निर्माण करतात. ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. (Fenugreek Seeds)