वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या गावी जात असतात. या काळात बस आणि रेल्वेला मोठी गर्दी असते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता सणासुदीच्या काळात विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे खात्याकडून घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने अहमदाबाद ते ग्वाल्हेर दरम्यान विशेष भाड्यावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कसे असेल वेळापत्रक ?
ट्रेन क्रमांक ०९४११/०९४१२ अहमदाबाद – ग्वाल्हेर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन
गाडी क्रमांक ०९४११ अहमदाबाद – ग्वाल्हेर स्पेशल अहमदाबादहून १९, २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर (शनिवार) रोजी 20.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता ग्वाल्हेरला पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक ०९४१२ ग्वाल्हेर-अहमदाबाद स्पेशल ग्वाल्हेरहून २०, २७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर (रविवार) रोजी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.05 वाजता सुटेल
या स्थानकांवर थांबे
अहमदाबाद-ग्वाल्हेर विशेष ट्रेन आनंद, छायापुरी, गोधरा, रतलाम, नागदा, उज्जैन, माकसी, गुना आणि शिवपुरी स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील.
कसे कराल बुकिंग ?
ट्रेन क्रमांक 09411 चे बुकिंग 16 ऑक्टोबरपासून प्रवासी आरक्षण केंद्र आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. ट्रेनच्या कामकाजाच्या वेळा, थांबे आणि संरचनेबाबत तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in वर भेट देऊन माहिती मिळवू शकतात.