विमान प्रवास महागला ! ऐन सणासुदीत प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विमानाचा प्रवास हा जलद आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखला जातो. हल्ली अनेक लोक वेळेची बचत करण्यासाठी विमानाने प्रवास करणे पसंत करतात. तुम्ही सुद्धा काही कामानिमित्त किंवा आगामी सणाच्या निमित्ताने विमान प्रवास करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एअरलाइन बुकिंगमध्येही जवळपास दुपट्टीने वाढ झाली आहे.

फ्लाइट बुकिंगमध्ये जवळपास 85 टक्के वाढ

वर्ल्ड ऑन हॉलिडेचा हवाला देत एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार दिवाळीसाठी फ्लाइट बुकिंगमध्ये सुमारे 85 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोक 27 दिवस अगोदर तिकिटे बुक करत आहेत. शिवाय तिकीट भाड्यातही सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या एक आठवडा आधी विमान भाडे दुप्पट झाले होते. यंदाही भाडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, गुवाहाटी, जयपूर, चेन्नई, लखनौ, पोर्ट ब्लेअर आणि पाटणा यांसारख्या ठिकाणांहून एअरलाइन्सला जास्तीत जास्त बुकिंग मिळत आहे.

कोणत्या शहरांचा समावेश ?

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीसाठी सर्वाधिक बुकिंग ३८६ टक्क्यांनी वाढले आहे. यानंतर जयपूरसाठी बुकिंग 306 टक्के आणि पटनासाठी 271 टक्क्यांनी वाढले आहे. इतर शहरांमध्येही बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अग्रगण्य प्रवासी वेबसाइट MakeMyTrip ने ऑगस्टपासून दिवाळीच्या फ्लाइटच्या बुकिंगसाठी विशेष मोहीम सुरू केली होती. लवकरच भाडे वाढणार असल्याचा इशाराही दिला आहे.