Flipkart वर आजपासून सुरु झालाय Big Saving Days Sale; iphone 14 वर मिळणार मोठा Discount

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Flipkart big saving day sale: सर्वपरिचित ई-कॉमर्स वेबसाईट अमेझोन व फ्लिपकार्टवर सेल ऑफर्स सुरू होत आहेत. अमेझोनच्या प्राईम-डे सेलच्या घोषणेनंतर आता फ्लिपकार्ट देखील आपल्या नवीन धमाकेदार ऑफर्ससह तयार आहे. ह्या ऑफर्समध्ये अनेक विद्युत उपकरणांवर भन्नाट सुट देण्यात येईल. एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही आणि स्मार्टफोन नंतर आता आईफओनवर देखील मोठी सुट मिळणार आहे.

फ्लिपकर्टच्या बीग सेवींग डे सेलची सुरुवात १५ जुलै २०२३ पासून होणार असून हा सेल १९ जुलै पर्यंत सुरू राहील. ह्या दरम्यान अनेक वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सुट मिळणार आहे . ह्या ऑफरचा फायदा करून घेत,‌ ग्राहक आयफोन १४ सह इतर विद्युत उपकरणांची खरेदी करु शकतात.

फ्लिपकार्ट बिग सेवींग डेज: iphone 14 बीग सेव्हिंग डील 

फ्लिपकार्टच्या ह्या सेवींग डेज सेलमध्ये एंड्रोइड स्मार्टफोनच्या किंमतीत भारी सुट देण्यात येणार आहे. विशेषत: एक्सिस बैंकच्या कार्डवर १० टक्क्यांची सवलत देण्यात येईल. सेल मध्ये लेटेस्ट रियलमी ११ सीरिजचे मोबाईल फोन सुध्दा सवलतीच्या दरात खरेदी करण्याची ही उत्तम संधी उपलब्ध आहे. विशेषकरून या बिग सेव्हिंग डेज सेल मध्ये १२८ जीबी स्टोरेज वोरंटीसह आयफोन १४ थेट ६०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल जो मुळ किंमतीच्या तुलनेत १२ हजार रुपये कमी आहे.

iphone 14 चे फिचर्स:

या फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले उपलब्ध आहे, डुअल रिअल कॅमेरा सेटअप ज्यात १२MP वाइड एंगल लेन्स, १२MP अल्ट्रा लाइफ एंगल, शिवाय १२MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

स्मार्टफोनच्या व्यतिरिक्त इतर विद्युत उपकरणे जसे की स्मार्टवॉच, स्मार्ट टीवी, इअरफओन, लॅपटॉप आणि अन्य गेमिंग एक्सेसरीजवर दरम्यान विशेष सुट देण्यात येईल. सदर गोष्टींच्या खरेदीवर ८० टक्क्यांची सवलत देखील दिली जाऊ शकते तसेच एसी, वॉशिंग मशीन,फ्रिज, कुलर व‌ पंख्यावर ७५ टक्क्यांची सुट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्टफोन, टीव्ही किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांच्या खरेदीसाठी ही एक उत्तम संधी आहे.