Flipkart Sale : काय सांगता ? केवळ 5,499 रुपयांत मिळतोय iPhone 13

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Flipkart Sale : सध्याच्या तरुणाई मध्ये iphone ची जबरदस्त क्रेझ आहे. पण iphone सगळ्यांच्याच खिशाला परवडेल असे नाही. मात्र Flipkart Sale च्या एका जबरदस्त ऑफर मुळे iphone 13 तुम्ही केवळ 5499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया कमी किमतीत कसा खरेदी करता येईल iphone

मागील वर्षी Apple iPhone 13 हा सर्वाधिक विकला गेला. विशेष म्हणजे याचे फीचर्स आयफोन 14 प्रमाणे जवळजवळ समान आहेत. परंतु खूपच कमी किमतीत आणि जर तुम्ही या उन्हाळ्यात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Sale तुम्हाला उत्तम संधी देत आहे. Apple iPhone 13 Flipkart Sale मध्ये विश्वास बसणार नाही एवढ्या कमी किमतीत उपलब्ध आहे.

कशी स्वस्त होईल किंमत ? (Flipkart Sale)

Apple iPhone 13 च्या कीमातेबद्दल सांगायचे झाल्यास सध्या Apple अधिकृत स्टोअरवर उपलब्ध सर्वात स्वस्त फ्लॅगशिप आहे. Apple iPhone 13 2021 मध्ये 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि सध्या तो Apple Store वर Rs 59,900 च्या कमी किमतीत उपलब्ध आहे. तथापि, फ्लिपकार्ट सेलमध्ये, तुम्ही 5,499 रुपयांच्या कमी किमतीत Apple iPhone 13 खरेदी करू शकता.

आता तुम्हीच म्हणाल एवढ्या स्वस्त किमतीत मोबाईल कसा उपलब्ध आहे ? तर त्याचे असे आहे की, Apple iPhone 13 (Flipkart Sale) वर 6,901 रुपयांच्या सवलतीनंतर 52,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. याशिवाय HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर रु. 1000 सूट मिळू शकते. Apple iPhone 13 ची किंमत 51,999 रुपयांपर्यंत खाली आणली आहे. या व्यतिरिक्त, खरेदीदार जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 46,500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकतात. सर्व ऑफर आणि बँक सवलतींसह, खरेदीदारांना Apple iPhone 13 फक्त Rs 5,499 मध्ये Flipkart सेलमधून मिळू शकेल.

काय आहेत फीचर्स ? (Flipkart Sale)

Apple iPhone 13 ला Apple iPhone 15 मालिका लॉन्च केल्यानंतर किंमतीत लक्षणीय (Flipkart Sale) कपात झाली. स्मार्टफोन 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात नाईट मोडसह 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. Apple iPhone 13 ने विकर्ण मागील कॅमेरा डिझाइन सादर केले जे कंपनी अद्याप फॉलो करत आहे.