Flipkart Super Cooling Days 2024 : नाद खुळा ऑफर!! AC वर मिळतोय 50% पर्यंत डिस्काउंट; कुठे अन कसा ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Flipkart Super Cooling Days 2024) राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे हवामानात उष्मा वाढला असून घामाच्या धारा लागत आहेत. अशावेळी घरात २४ तास पंखे सुरु राहतात. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्यातमध्ये एअर कंडिशनर लावण्याचा विचार करतात. थोडा वेळ कुलिंग केलं तरी बराच वेळ थंड हवेचा लाभ घेता येतो. त्यामुळे उन्हाळ्यात एसी अगदी मूलभूत गरजांपैकी एक वाटू लागतो. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अगदी योग्य आहे. कारण फ्लिपकार्टवर मस्त सेल सुरु झाला आहे. ज्याच्या अंतर्गत तुम्हाला चांगले ५ स्टार रेटिंग असणारे ब्रँडेड एसी मोठ्या सवलतींसह खरेदी करता येणार आहेत.

Flipkart सुपर कूलिंग डेज सेल (Flipkart Super Cooling Days 2024)

नुकताच फ्लिपकार्ट या लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग साईटवर सुपर कूलिंग डेज २०२४ हा सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये गरमीपासून आराम देणारी सर्व होम कुलिंग अप्लायन्सेस अगदी अर्ध्या किमतीत खरेदी करता येत आहेत. यात पंखे, कुलर, एसी आणि फ्रीज अशा उपकरणांचा समावेश आहे. हा जबरदस्त सेल येत्या २३ एप्रिल २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. चला तर, या सेलमध्ये कोणत्या कंपनीचा एसी किती रुपये सवलतीने मिळणार आहे? याविषयी जाणून घेऊ.

Realme कंपनीचा AC

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Realme कंपनीच्या Techlife २०२४ या एसीच्या मॉडेलवर एकूण ५१% पर्यंत सूट उपलब्ध आहे. हा एसी १.५ टन असून ५ स्टार स्प्लिट इन्व्हर्टर स्मार्ट वाय- फाय कनेक्शनसोबत येतो. (Flipkart Super Cooling Days 2024) या एसीचे वाय-फाय कनेक्टिव्हिटी फीचर त्याला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करते. हा एसी फ्लिपकार्टच्या सुपर कुलिंग डेज सेलमध्ये ३१,९९० रुपये किंमतीला विकला जात आहे. याची मूळ किंमत ६५,९९९ रुपये इतकी आहे.

Voltas एसी

फ्लिपकार्टच्या सुपर कुलिंग डेज सेलमध्ये Voltas २०२३ या एसीच्या मॉडेल्सवरदेखील चांगली सूट उपलब्ध आहे. या सेलमध्ये ५०% डिस्काउंटसह हा १.५ टनचा 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी तुम्ही खरेदी करू शकता. या सेलमध्ये हा एसी ३७,९९० रुपयांना विकला जात आहे. त्याची मूळ किंमत ७५,९९० रुपये इतकी आहे.

LG एसी

LG कंपनीचा AI Convertible 6-in-1 Cooling 2024 Model एसीवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ४७% पर्यंत सूट उपलब्ध आहे. त्यामुळे हा १ टनचा ५ स्टार स्प्लिट इन्व्हर्टर ४ एसी तुम्हाला ३९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. ज्याची मूळ किंमत ७५,९९० रुपये इतकी आहे. (Flipkart Super Cooling Days 2024) या एसीमध्ये एअर स्विंग एचडी फिल्टर अँटी- व्हायरस प्रोटेक्शन विराट मोड आणि एडीसी सेन्सर आहे. त्यामुळे हा एसी इतर एसींपेक्षा दमदार सिद्ध होतो. तसेच, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या एसीवर ५,४०० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

CARRIER एसी

फ्लिपकार्टच्या सुपर कुलिंग डेज सेलमध्ये Carrier कंपनीच्या १.५ टन ३ स्टार स्प्लिट एसीवर ४४% सूट उपलब्ध आहे. त्यामुळे हा एसी तुम्हाला ४१,९९० रुपयांना खरेदी करता येईल. (Flipkart Super Cooling Days 2024) ज्याची मूळ किंमत ७६,०९० इतकी आहे. यावर तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ मिळत आहे. त्यानुसार तुम्ही या एसीवर ५,४०० रुपयांच्या एक्सचेंज डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकता.

Panasonic एसी

फ्लिपकार्टच्या सुपर कुलिंग डेज सेलमध्ये Panasonic कंपनीच्या ७ इन १ कन्व्हर्टेबल टू एआय मोड एसीवर २९% सूट उपलब्ध आहे. त्यामुळे हा मॅटर इनेबल्ड १.५ टनचा ५ स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी, वाय-फाय कनेक्टिंग फीचरसोबत ४४,९९० रुपयांना खरेदी करता येईल. ज्याची मूळ किंमत ६३,४०० रुपये इतकी आहे. तसेच यावर तुम्ही ५,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटचादेखील लाभ घेऊ शकता. (Flipkart Super Cooling Days 2024)