हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flying Car – सरला एविएशन ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये आपली फ्लाइंग एयर टॅक्सी “शून्य” (Sarla Aviation Shunya) प्रदर्शित केली आहे. ही एयर टॅक्सी 250 किमी प्रति तासाच्या गतीने हवाई मार्गाने प्रवास करू शकणार आहे. तसेच सरला एविएशनने सादर केलेली eVTOL (इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग) टेक्नोलॉजी भविष्यात ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाच्या समस्या दूर करण्यास मदत करेल . याचसोबत 2028 पर्यंत बेंगलुरूमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. हि टॅक्सी प्रवाशांना फायदेशीर ठरणार असून , त्यांचा प्रवास सोप्पा होणार आहे. तर चला या टॅक्सिबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एयर टॅक्सी (Flying Car) –
सरला एविएशनच्या शून्य मॉडेलची गती 250 किमी प्रति तास आहे आणि ती 160 किमीच्या रेंजसाठी डिझाईन केली गेली आहे. तसेच ती 25-30 किमीच्या शॉर्ट हॉल प्रवासासाठी आदर्श आहे आणि 6 प्रवाशांसह एक पायलट सवार होऊ शकतात. या एयर टॅक्सीचे वजन 680 किलोग्राम पर्यंत सहन करण्याची क्षमता आहे.
सरला एविएशनचे को-फाउंडर आणि सीईओ एड्रियन श्मिट म्हणाले की, “भारताच्या आर्थिक क्षमतेला अनलॉक करणे आणि एक स्वच्छ, जास्त कनेक्टेड भविष्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आम्ही काम करत आहोत.”
फीचर्स आणि तंत्रज्ञान –
शून्य एयर टॅक्सीचा (Flying Car) केबिन अत्याधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. हि 6-सीटर आणि 4-सीटर कॉन्फिगरेशनसह कस्टमायझेबल असेल, जे केवळ प्रवासी वाहक म्हणूनच नाही, तर मालवाहतूकासाठी देखील उपयोगात येऊ शकते. तसेच eVTOL वाहन असल्याने, त्याला मोठ्या रनवेची आवश्यकता नाही. हे थेट उभे राहून उडू शकते.
बेंगलुरूमध्ये 30 फ्लाइंग एयर टॅक्सीज लाँच (Flying Car)–
सरला एविएशनने 2028 पर्यंत बेंगलुरूमध्ये 30 फ्लाइंग एयर टॅक्सीज (Flying Car) लाँच करण्याची योजना आखली आहे, ज्याचा विस्तार मुंबई, दिल्ली आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांमध्ये होईल. हे एयर मोबिलिटीच्या क्षेत्रात नवे युग सुरु करेल, ज्यामुळे शहरी प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होईल.
कंपनीच्या नावामागे एक ऐतिहासिक कथा –
सरला एविएशनची स्थापना 2023 मध्ये एड्रियन श्मिट, राकेश गांवकर आणि शिवम चौहान यांनी केली. त्यांना अलीकडेच एक्सेल फंडिंगद्वारे 10 मिलियन डॉलरची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. कंपनीच्या नावामागे एक ऐतिहासिक कथा आहे. सरला एविएशनचे नाव भारताच्या पहिल्या महिला पायलट सरला ठकराल यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, ज्यांनी 1936 मध्ये केवळ 21 वर्षांच्या वयात आपले पायलट लायसन्स मिळवले होते.
हे पण वाचा : 6 रनवे, 65 उड्डाणे, 10 एरोब्रिजेस…. ; नोएडा विमानतळाच्या खास गोष्टी पहाच