हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flying Taxi – आपल्याला सध्या ट्रॅफिक जाम आणि जास्त प्रवासाच्या वेळेमुळे किती कष्ट पडतात, हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. पण आता, भारतात एक अशी एअर टॅक्सी येणार आहे जी शहरी वाहतुकीचा चेहरा बदलून टाकू शकते . भारताच्या एरोस्पेस क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकत, स्टार्टअप सरता एव्हिएशन ने ‘स्टार्टअप महाकुंभ’ मध्ये आपली प्रोटोटाइप फ्लायिंग टॅक्सी ‘शून्य’ सादर केली आहे. ही देशातील पहिली स्वदेशी एअर टॅक्सी आहे, जी शहरी वाहतुकीला नवीन उंचीवर नेण्याच्या उद्देशाने तयार केली गेली आहे.
‘शून्य’ काय आहे? (Flying Taxi) –
शून्य एक इलेक्ट्रीक फ्लायिंग टॅक्सी आहे, जी एकावेळी 6 प्रवाश्यांना घेऊन 160 किमीपर्यंत उडू शकते. सुरुवातीला ती 20-30 किमीच्या छोट्या अंतराच्या प्रवासासाठी वापरली जाईल. आणि ही टॅक्सी 250 किमी प्रतितास वेगाने उडू शकते. त्यामुळे, ट्रॅफिकमध्ये न अडकता आपण लवकर आणि आरामात आपल्या ठिकाणी पोहोचू शकू. तसेच ही टॅक्सी फक्त 20 मिनिटांत चार्ज होऊन पुन्हा उड्डाणासाठी तयार होईल. म्हणजे, एक ट्रिप संपली की लगेच दुसरी सुरू होईल. एक पायलट आणि 6 प्रवाशी असलेली या टॅक्सीत बसून आपण आसमानी सफर करू शकता.
कधी सुरू होईल? –
सरता एव्हिएशनचं लक्ष्य आहे की 2028 पर्यंत बंगलोरमध्ये ‘शून्य’ (Flying Taxi) ची वाणिज्यिक सेवा सुरू केली जाईल. नंतर, मुंबई, दिल्ली, नोएडा, पुणे आणि इतर शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल. या फ्लायिंग टॅक्सीसाठी ट्रिपची किंमत ओला-उबरच्या प्रीमियम सेवेसारखीच ठेवण्याचा विचार आहे, म्हणजे साध्या माणसांसाठीही ती परवडणारी होईल. तसेच आपल्या दैनंदिन प्रवासाच्या सोयीशिवाय, शून्य एअर टॅक्सी एक आणखी महत्त्वाची गोष्ट देणार आहे – फ्री एअर Ambulance सेवा. हे विशेषतः गंभीर रुग्णांना ट्रॅफिक जाममध्ये अडकू न देता वेळेवर रुग्णालयात पोहोचवायला मदत करेल. या टॅक्सीमुळे आपल्याला ट्रॅफिकपासून वाचता येईल अन पर्यावरणाला देखील फायदा होईल.