Gadchiroli Railway : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे थांबणार कोरबा एक्सप्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gadchiroli Railway : संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे जाळे पसरलेले आहेत. कमी पैशांमध्ये सुलभ सेवा देणारी ही रेल्वे केवळ एका मार्गावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत नाही तर अनेकांना रोजगार देखील देते. कोरोना काळामध्ये रेल्वेच्या प्रवासावर मोठा फरक पडला होता काही मार्गावरील ट्रेन या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एक गडचिरोली जिल्ह्यातील ट्रेन आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील (Gadchiroli Railway) देसाईगंज वडसा इथे थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता देसाईगंज वडसा येथे ट्रेन थांबणार आहे.

जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनला (Gadchiroli Railway) हूल देत पुढे निघून जाणारी यशवंतपुर-कोरबा-वैनगंगा एक्स्प्रेस या रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. यासंदर्भात खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी नंतर ही गाडी देसाईगंज वडसा इथे थांबा घेईल.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील एकमेव रेल्वे स्टेशन देसाईगंज (वडसा) (Gadchiroli Railway) आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशां‌ची वर्दळ असते. कोरोना दरम्यान सुपरफास्ट व पॅसेंजर सर्वच गाड्या बंद होत्या. परंतु नंतर कोरोना शिथिलतेनुसार संपूर्ण गाड्या चालू (Gadchiroli Railway)झाल्या.कोरोनाच्या पूर्वी कोरबा-यशवंतपुरम-वैनगंगा-सुपरफास्ट ट्रेनचा थांबा (स्टापेजेस) देसाईगंज (वडसा) येथे होता. परंतु कालांतराने देसाईगंज (वडसा) येथे थांबा बंद केल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊन रोष व्यक्त केला जात होता. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन ही समस्या सातत्याने सांगितली होती.

या प्रयत्नांना अखेर यश येऊन देसाईगंज (वडसा )रेल्वे स्टेशनला (Gadchiroli Railway) यशवंतपुर-कोरबा-वैनगंगा एक्स्प्रेस देसाईगंज (वडसा)रेल्वे स्टेशन थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत