Ganeshotsav 2024 : कोकणात जाण्यासाठी आणखी 20 रेल्वे गाड्या वाढवल्या ; पहा वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने 202 गणपती उत्सवासाठी (Ganeshotsav 2024) विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे.

आता त्यामध्ये आणखी वाढ झाली असून आणखी 20 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एकूण 222 गणपती उत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध असतील. या नव्या गाड्यांचा आरक्षण 7 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. चला जाणून घेऊया या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक (Ganeshotsav 2024) काय असेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण आठ फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 0 1 0 31 एलटीटी इथून 6, 7, 13, 14 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार 50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर तीच गाडी रत्नागिरी इथून 7,8,14 आणि 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 : 40 वाजता सुटेल आणि एलटीटी इथे त्याच दिवशी सायंकाळी (Ganeshotsav 2024) पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 0 1 4 4 3 पनवेल इथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 0 1 4 4 4 रत्नागिरी इथून 7 आणि 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पनवेल इथं दुसऱ्या दिवशी रात्री दीड (Ganeshotsav 2024) वाजता पोहोचेल.

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या धावतील गाडी क्रमांक 0 1 4 4 1 पनवेल इथून 11 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. तर दुसरी गाडी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पन्नास वाजता रत्नागिरी इथून गाडी सुटेल आणि पनवेल इथे दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता पोहोचेल.

तसंच पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या सहा फेऱ्या होणार आहेत या सर्व गणपती विशेष रेल्वे गाड्यांचा आरक्षण हे 7 ऑगस्टपासून सर्व ठिकाणी संगणकीकृत आरक्षण केंद्रावर करण्यात येईल. शिवाय IRCTC च्या संकेतस्थळावर देखील विशेष शुल्क मध्ये सुरू होणार असं मध्य रेल्वे कडून सांगण्यात आला आहे.