Gardening Tips : अनेकदा केळ खाऊन आपण केळीचे साल हे फेकून देतो मात्र केळीचं साल सुद्धा उपयोगी पडू शकते. या केळीच्या सालीचा उपयोग तुमच्या परसबागेतील झाडांसाठी उत्तम प्रकारे होऊ शकतो त्यामुळे तुमच्या परसबागेतील झाड (Gardening Tips) अतिशय सुंदर फुलतील यात शंका नाही.
आपल्याला माहीतच आहे की स्वयंपाक घरातील ओला कचरा हा परसबागेसाठी (Gardening Tips) उत्तम खत बनवू शकतो. मग अंड्यांची साल असतील भाजीचे देठ असतील किंवा केळाची साल हे सर्व निरोपयोगी पदार्थ तुमच्या बागेसाठी उत्तम खत म्हणून काम करतात. त्यामुळे तुमची झाडं हिरवीगार आणि सदैव फुललेली असतील. चला तर मग आजच्या लेखात हे पाहुयात की केळीच्या सालीचा तुमच्या परसबागेसाठी (Gardening Tips) कसा बरं उपयोग करून घ्यायचा?
फॉलो करा या स्टेप्स (Gardening Tips)
- सुरुवातीला केळीचे साल घ्या. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करा. नंतर अर्धा लिटर पाणी गरम करा त्या पाण्यात केळीच्या सालांचे तुकडे टाका आणि हे मिश्रण 24 तास थंड जागी झाकून ठेवा.
- एकदा का चोवीस तास झाले की त्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं या पाण्यामध्ये आता दहा मिली व्हाईट व्हिनेगर टाकायचं. व्हाईट व्हिनेगर मुळे त्या पाण्यातल्या साखरेच्या अंशाचा ब्रेक डाऊन लवकर होतो आणि त्याचा फायदा झाडांच्या फुलांच्या वाढीसाठी होतो.
- आता हे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि प्रत्येक फुलं झाडाला थोडं थोडं करून हे पाणी टाका. दहा ते बारा दिवसातून एकदा हा उपाय केला तरी चालेल. त्यानंतर तुमची फुलं उत्तम फुललेली (Gardening Tips) दिसतील.