Gate To Hell Cave : भारतातील असं मंदिर जिथे आहे ‘नरकाचा दरवाजा’; प्रवेश केल्यास मृत्यू अटळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gate To Hell Cave) संपूर्ण भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक वेगळी आख्यायिका आणि प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. देशातील या मंदिरांमध्ये एक असं मंदिर आहे ज्या मंदिराची ओळख अत्यंत वेगळी आणि इतरांपेक्षा अनोखी आहे. असं म्हणतात की, या मंदिरात ‘डोअर्स ऑफ हेल’ अर्थात ‘नरकाचा दरवाजा’ आहे. त्यामुळे या मंदिराच्या आत जो कोणी जातो त्याचा मृत्यू होतो. आता हा ‘नरकाचा दरवाजा’ असलेल्या या मंदिराचं नेमकं काय रहस्य आहे? याविषयी जाणून घेऊया.

नरकाचा दरवाजा (Gate To Hell Cave)

तुर्कस्तानमधील हिरापोलिस शहरात एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला ‘नरकाचा दरवाजा’ म्हणून ओळखले जाते. येथील स्थानिक असे सांगतात की, या मंदिरात गेलेला माणूस कधीही जिवंत परत येत नाही. या मंदिरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेहदेखील सापडत नाही. केवळ मनुष्य नव्हे तर पशु वा पक्षी देखील या मंदिरात गेल्यास पुन्हा जिवंत परतत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे या मंदिराला ‘नरकाचा दरवाजा’ किंवा ‘गेट टू हेल’ अशी ओळख मिळाली.

मंदिराचे रहस्य

प्राचीन रोमन आणि ग्रीक काळात या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. अगदी तेव्हापासून या मंदिरात जायला लोक घाबरत आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आतापर्यंत या मंदिराचे रहस्य नेमके काय आहे? याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. (Gate To Hell Cave) मात्र, त्यांच्या हाती फारसे स्पष्ट पुरावे आलेले नाहीत. एका वृत्तानुसार, प्राचीन ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ स्ट्रॅबोदेखील येथे आले होते. त्यांनी आपल्या ‘जिओग्राफीका’ या पुस्तकात याविषयी लिहिले आहे. त्यानुसार, ही एक छोटी गुफा असून आत प्रचंड धुकं आहे.

या गुफेत जाणारा जीव पशु असो वा पक्षी काही सेकंदातच मरण पावतो. त्यांनी केलेल्या प्रयोगानुसार गुफेत सोडलेल्या चिमण्या काही सेकंदात मरून पडले. यानंतर त्यांनी बैलदेखील पाठवले. तेसुद्धा मृत्युमुखी पडले. (Gate To Hell Cave) मात्र, जेव्हा काही पुरोहितांना नपुंसक बनवून या गुफेत मरणासाठी पाठवलं तेव्हा ते मात्र जिवंत परतले. यावर शास्त्रज्ञस स्ट्रॅबो म्हणाले, त्यांना नपुंसक बनवल्यामुळे असे घडले असावे. मात्र, नेमके या घटनेमागील रहस्य काय आहे? हे काही स्पष्ट होऊ शकले नाही.

मंदिराच्या आत आहे तरी काय?

एका प्राचीन लोककथेनुसार असे सांगितले जाते की, हा ‘नरकाचा दरवाजा’ प्राण्यांचा बळी देण्यासाठी वापरला जात होता. यामध्ये पक्षी, बैल आणि इतर प्राणी हे देवाचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. (Gate To Hell Cave) त्यामुळे मंदिराच्या अवशेषांवर पक्षांचे सांगाडे पहायला मिळतात. तसेच मंदिरांच्या खांबांवर देवांचे शिलालेख देखील दिसून येतात.

शास्त्रज्ञांनी केले संशोधन

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार येथे उत्खनन केले असता असे समोर आले की, येथे एक हॉटस्पॉट आहे जिथे पोहोचताचं कोणताही सजीव मरण पावतो. तसेच या ठिकाणी कार्बन डाय- ऑक्साइडची पातळी खूप जास्त असल्याचे समोर आले. या ठिकाणी रात्रीच्यावेळी C02 ची पातळी वाढत असल्याचे समोर आले.

(Gate To Hell Cave) या संशोधनात असेही आढळले की, मंदिराखालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू सतत बाहेर पडत असल्याने मानव, प्राणी, पक्षी यांसारख्या सजीवांचा विषारी वायूशी थेट संपर्क येतो. परिणामी त्यांचा मृत्यू होतो. या मंदिराला भेट देण्याची अत्यंत धोकादायक वेळ ही पहाटेची वेळ असल्याचे सांगितले जाते.