एकीकडे पुण्यामध्ये जीबीएस या रोगाने घबराहट निर्माण केली असताना आता हा जीबीएस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हात पाय पसरू लागला आहे.
पुण्यासोबतच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथे देखील या साथीचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता साताऱ्यात सुद्धा जीबीएस चा शिरगाव झाला असून सातारासह कराडमध्ये ही रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातारा जिल्हा मध्ये पहिल्यांदाच जीबीएस चे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
आजाराची भीती बाळगू नये
मिळालेल्या माहितीनुसार यामधील एक रुग्ण हा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दोन रुग्ण सातारातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एक रुग्ण कराडमध्ये उपचार घेतोय या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अधिकरेके खाली उपचार सुरू आहेत नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच कोणतीही अफवा पसरवू नये असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केला आहे.
काय सांगते आकडेवारी ?
दरम्यान या आजारामुळे मृतांची संख्या दोन झाली असून बुधवारी जीबीएस या साथीच्या रोगाची 16 नवीन प्रकरण नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्राच्या एकूण आकडेवारी बद्दल सांगायचं झाल्यास 29 जानेवारी पर्यंत जीबीएस च्या 127 संशयित रुग्णांची ओळख पटली असून त्यामध्ये दोन संशयित मृत्यू आहेत यापैकी 72 रुग्णांमध्ये जीबीएस ची पुष्टी झाली आहे. 23 रुग्ण पुणे महापालिकेतील 73 रुग्ण पीएमसी क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आणि 13 पिंपरी चिंचवड महापालिकेतील असून नऊ पुणे ग्रामीण आणि नऊ रुग्ण इतर भागातील आहे. बाधितांपैकी 20 जण सध्या व्हेंटिलेटर वर आहेत.
गुइलियन-बारे सिंड्रोम (GBS)
गुइलियन-बारे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ पण गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली (immune system) चुकून स्नायू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे कमजोरी आणि अर्धांगवायू (paralysis) सारखी लक्षणे दिसू शकतात.
GBS ची कारणे आणि कारणीभूत घटक
प्रतिरोधक यंत्रणेचा चुकून मज्जासंस्थेवर हल्ला
व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गानंतर होण्याची शक्यता
फ्लू, कोविड-19 किंवा इतर श्वसनविकारानंतर विकसित होऊ शकतो
काही प्रकरणांमध्ये लसीकरणानंतर किंवा सर्जरीनंतर देखील दिसतो
कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी (Campylobacter jejuni) नावाच्या बॅक्टेरियामुळे होऊ शकतो
GBS ची मुख्य लक्षणे
कमजोरी आणि सुन्नपणा – सुरुवातीला पाय आणि पोटऱ्यांमध्ये जाणवतो
स्नायूंच्या हालचालींवर परिणाम – चालताना किंवा उठताना त्रास होतो
अर्धांगवायू (Paralysis) – स्नायूंवर नियंत्रण कमी होते
धडधड आणि रक्तदाबातील चढ-उतार
श्वास घेण्यास त्रास – गंभीर प्रकरणांमध्ये व्हेंटिलेटरची गरज लागू शकते
बोलण्यास आणि गिळण्यास त्रास
चक्कर येणे आणि संतुलन बिघडणे
तीव्र वेदना – खासकरून पाठदुखी आणि स्नायू दुखणे